केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे एक व्यवच्छेदक वैशिष्टय़ म्हणजे साधारणपणे येथे देशातील जनतेच्या ‘मूड’चे प्रतिबिंबच पाहायला मिळते. बहुतेक ठिकाणी पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असून कमी लोकसंख्या, केवळ एकमेव खासदार आणि उदंड उमेदवार हे येथील निवडणुकांचे महत्त्वाचे वैशिष्टय़. या मतदारसंघात आजवर एकदाही महिला उमेदवारास प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा केंद्रशासित प्रदेशांचा हा आढावा..
अंदमान आणि निकोबार बेटे
या बेटांवरील सुमारे अडीच लाख मतदार आपला एकमेव प्रतिनिधी निवडून देतील. अनेक वर्षे येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. मनोरंजन भक्त हे काँग्रेसचे उमेदवार येथून एकूण आठ वेळा निवडून आले. मात्र त्यांनी काँग्रेसमधून तृणमूल पक्षात प्रवेश घेतल्याने यंदा चित्र थोडेसे वेगळे आहे. त्यात मागील निवडणुकीत येथे भाजपचे बिष्णू पद राय निवडून आल्याने काँग्रेसची परिस्थिती थोडी अवघड आहे. सामरिकदृष्टय़ा तसेच पर्यावरणीय वैविध्याच्या दृष्टीने असलेले या बेटांचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे. यंदा गौरचंद्र मजुमदार (बसप), रघुवीर सिंग (सप) आणि संजय मेशक (आप) हेही रिंगणात असल्याने काँग्रेस आणि भाजप यांच्या मतांचे विभाजन होणार हे नक्की.
दादरा आणि नगर हवेली
गुजरात राज्याच्या सीमेवरील हा केंद्रशासित प्रदेश. येथे काँग्रेस, भाजप, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, बसप आणि राष्ट्रवादी या पक्षांचे जाणवण्याइतपत अस्तित्व आहे. आजवर झालेल्या येथील निवडणुकांमध्ये ४ वेळा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे कोणीही गृहीत धरावी अशी येथील परिस्थिती नाही. येथे एकमेव खासदार असून सध्या ही जागा भाजपकडे आहे. काँग्रेसतर्फे येथे मोहनभाई सांजीभाई देलकर, तर भाजपतर्फे विद्यमान खासदार नथुभाई गोमनभाई पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपनेही रिंगणात उडी घेत छोटूभाई पटेल यांना उभे केले आहे. सुमारे पावणेदोन लाख मतदार आपल्या प्रतिनिधीची निवड करतील.
दमण-दीव
सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि सर्वात कमी लिंगगुणोत्तर असलेला हा केंद्रशासित प्रदेश. १९८७ साली स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनलेल्या दमण आणि दीवमध्ये एकमेव खासदार असून मागील निवडणुकीत भाजपच्या लालूभाई पटेल यांचा विजय झाला होता. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात येथे सुमारे लाखभर मतदार आपला प्रतिनिधी निवडून देतील. आपने येथे केस्सुर गोवन यांना उमेदवारी दिली आहे.
लक्षद्वीप
येथेही केवळ एकच खासदार असून सध्या ही जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आली आहे. १५ व्या लोकसभेत काँग्रेसचे मोहम्मद हमदुल्ला सईद येथून विजयी झाले होते. देशातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मान सईद यांनी मिळवला होता. सईद हे लोकसभेचे माजी उपसभापती पी.एम. सईद यांचे चिरंजीव. यंदाही ते उभे असून काँग्रेसला त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा आहे. येथे केवळ सव्वा अठ्ठेचाळीस हजार मतदार आहेत. मात्र रिंगणात माकपचे डॉ. अबुल मुनीर, काँग्रेसचे मोहम्मद हमदुल्ला सईद, भाजपचे सईद कोया आदी उमेदवार आहेत.

Nagpur Lok Sabha Small increase in voter turnout what does it signal
नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
Unemployment inflation are the important issues trend in CSDS pre election survey
बेरोजगारी, महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे; ‘सीएसडीएस’ निवडणूकपूर्व सर्वेक्षणातील कल