गोव्यात लोकसभेच्या दोन जागांवर उभ्या राहिलेल्या १९ उमेदवारांपैकी एक तृतीयांश उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत, असे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रीफॉर्मस्’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केले आहे. तीन उमेदवारांवर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत तर उत्तर गोव्यातील एका अपक्ष उमेदवारावर चार गुन्हे दाखल आहेत.  चर्चिल आलेमाव,  गोविंद गावडे यांच्यावर प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत.

२,३१,६१,२९६
ही आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या. एकूण मतदारांपैकी या वयोगटातील मतदारांची संख्या २.८ टक्के आहे. महाराष्ट्रात या वयोगटातील मतदारांची संख्या १० लाख ७५ हजार ३७६ नवमतदार आहेत.

“निवडणूक प्रचार सभांचा खर्च मोजण्याचा प्रकार त्यावर निवडणूक आयोगाचे र्निबध ही लोकशाहीची थट्टा आहे. या र्निबधामुळे आमच्या उमेदवाराची ओळखही आम्ही करून देऊ शकत नाही. याला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.”
जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री