07 August 2020

News Flash

सरकारी योजनांपासून ‘राजकीय लाभार्थी’च वंचित

अन्न सुरक्षा कायद्यामुळे राजकीय लाभ होईल, असे चित्र उभे केले गेले. पण यासह अनेक लोकोपयोगी योजनांचा फारसा राजकीय लाभ निवडणुकीत झालेला दिसत नाही

| May 3, 2014 04:21 am

अन्न सुरक्षा कायद्यामुळे राजकीय लाभ होईल, असे चित्र उभे केले गेले. पण यासह अनेक लोकोपयोगी योजनांचा फारसा राजकीय लाभ निवडणुकीत झालेला दिसत नाही, असा सूर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी लावला.
अन्न सुरक्षा योजनेचे आम्ही प्रचार सभांमध्ये गोडवे गायले, पण लोकांकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया उमटत नव्हती, याकडे एका मंत्र्याने लक्ष वेधले. आरोग्य जीवनदायी योजनांच्या माध्यमातून राज्यात लाखांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. शासनाने विविध ५५ योजना राबविल्या असून, त्याची जाहिरातबाजीही करण्यात आली. पण या साऱ्यांचा कितपत उपयोग झाला, असा सवाल काही मंत्र्यांनी उपस्थित केल्याचे समजते.
सरकारी योजनांचा २००९च्या निवडणुकीत चांगला राजकीय फायदा झाला होता. यंदा मात्र योजनेचा तेवढा फायदा झाला नाही, असा सत्ताधारी काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 4:21 am

Web Title: political beneficiary away from government schemes
Next Stories
1 ‘प्रियंका मुलीसमान असल्याचे मोदी म्हणालेच नाहीत’
2 ..तर सार्वजनिक जीवनाचा त्याग करेन – पटेल
3 मोदी सत्तेसाठी आसुसलेले – प्रियंका
Just Now!
X