03 August 2020

News Flash

अभिनेत्या भावांना राजकारणाने वैरी बनविले

तेलुगू चित्रपटसृष्टीतले दोन मेगास्टार असणाऱ्या भावांमध्ये राजकारण आडवे आले आहे. होय, मेगास्टार के चिरंजीवी आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणारा

| March 14, 2014 12:03 pm

तेलुगू चित्रपटसृष्टीतले दोन मेगास्टार असणाऱ्या भावांमध्ये राजकारण आडवे आले आहे. होय, मेगास्टार के चिरंजीवी आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणारा त्यांचा भाऊ के पवन कल्याण यांनी राजकारणात उतरून आपापले मार्ग चोखाळल्यामुळे  कुटुंबामध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
तेलुगू तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणाऱ्या चिरंजीवी यांनी १९९९ मध्ये स्वत:च्या प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केली. मात्र  २०११ मध्ये आपल्या पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करून केंद्रात स्थिरस्थावर झाले. मात्र सारे काही सुरळीत चालू असतानाच चिरंजीवी यांचे बंधू पवन कल्याण यांनी राजकारणात सक्रिय होऊन स्वतचा नवा पक्ष स्थापण्याची घोषणा केल्यामुळे दोघा भावांमधील तेढ निर्माण झाली आहे.  पवन कल्याण येत्या शुक्रवारी नव्या जन सेना पक्षाची स्थापना करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2014 12:03 pm

Web Title: politics made actor brothers enemy of each other
Next Stories
1 बिहारच्या जनता दलामध्ये असंतोष
2 २५ जागा लढविण्याचा रिपाइं (के)चा निर्णय
3 संक्षिप्त : प्राप्तिकर विभागाची निवडणुकीतील काळ्या पैशांवर नजर
Just Now!
X