News Flash

वाराणसीतून मोदींविरोधात लढण्याच्या चर्चेला प्रियंका गांधींकडून पूर्णविराम

लोकसभा निवडणूकीत वाराणसी मतदार संघातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रियंका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा खुद्द प्रियंका गांधी यांनी फेटाळून लावली.

| April 14, 2014 12:16 pm

लोकसभा निवडणूकीत वाराणसी मतदार संघातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रियंका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा खुद्द प्रियंका गांधी यांनी फेटाळून लावली.
देशासाठी मोदींना रोखण्याचे मत प्रियंका गांधी यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे व्यक्त केले होते. त्यामुळे प्रियंका गांधी वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू होती. परंतु, प्रियंका गांधी यांनी, “माझे लक्ष केवळ रायबरेली आणि अमेठीतील प्रचाराकडे आहे.” असे सांगून निवडणूक लढविण्याचा मानस नसल्याचे स्पष्ट केले. तसेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा संपूर्णपणे वैयक्तीक असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रत्येक निवडणूकीत आई सोनिया गांधी आणि बंधू राहुल गांधी यांच्या मतदार संघांमध्ये प्रचार करणे माझे कर्त्यव्य आहे आणि ते मी निभावत असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. त्यामुळे वाराणसीतून मोदींविरोधात काँग्रेसकडून प्रियंका गांधी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 12:16 pm

Web Title: priyanka gandhi denies report on fighting polls against modi says her focus remains rae bareli and amethi
Next Stories
1 BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं!
2 ‘चांदी’ची भाववाढ सुषमा, सुप्रिया आणि सोनियांना पडली महागात
3 एक म्यान, एक तलवार..
Just Now!
X