मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (एमपीपीईबी) घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून ती भरकटली जावी यासाठी काँग्रेस आरोप करीत असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.  पुराव्यांच्या आधारावर अनेक उच्चपदस्थांना या घोटाळ्यात आरोपी करण्यात आले आहे. सरकारने याबाबत अत्यंत त्वरेने पावले उचलल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारची स्तुती केली असून, हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठीची याचिका फेटाळली आहे, असे चौहान यांनी ट्विट केले आहे.