आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इन्कार केला आहे. भाजप सत्तेत आल्यास २२ हजार लोक हिंसाचारात ठार होतील, असे प्रचारसभेदरम्यान वक्तव्य केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. लोकांचे म्हणणे काय आहे याबाबत बोललो, असे राहुल यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १ मे रोजी हिमाचलमध्ये बोलताना राहुलनी जपानचा संदर्भ देत देशात अशांतता निर्माण होणार काय, असा सवाल उपस्थित केला होता. देशातील लोकांशी भांडणार काय, असा सवाल केल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यास आम्हाला भीती वाटते. ते द्वेष पसरवतात असा प्रश्न कधीही विचारला नव्हता, असे ते म्हणाले.