News Flash

राहुल गांधींकडून आंबेडकरांचा अपमान – मोदी

देशातील नागरिकांना सगळे अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत.

| April 14, 2014 01:00 am

देशातील नागरिकांना सगळे अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. मात्र, आम्ही हा कायदा केला, तो कायदा केला, असे सांगत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आंबेडकरांचा अपमान करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये केली.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदी यांनी कॉंग्रेसवर प्रखर शब्दांत हल्ला केला. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील दलितांना, पीडितांना, शोषितांना न्याय मिळवून दिला. त्यांनी देशवासियांसाठी अनमोल संविधान बनविले. मात्र, देशाचे दुर्भाग्य की शहजादे आंबेडकरांचा अपमान करण्यातच आनंद मानतात. कॉंग्रेसने हा कायदा केला, तो कायदा केला, असे सांगत ते फिरतात. पण देशातील नागरिकांना सगळे अधिकार आंबेडकरांनी दिले आहेत. त्यांनी बनविलेल्या राज्यघटनेतूनच नागरिकांना वेगवेगळे अधिकार मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:00 am

Web Title: rahul gandhi insulted babasaheb ambedkar says narendra modi
Next Stories
1 विवेकपूर्ण मतदानानेच ‘स्वराज्य’
2 पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार
3 मतदानाची टक्केवारी वाढतीच
Just Now!
X