04 August 2020

News Flash

राजनाथ सिंग यांना तिवारींकडून आशीर्वाद

भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे लखनऊ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून त्यांनी शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

| April 27, 2014 01:53 am

भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे लखनऊ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून त्यांनी शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन राजनाथ सिंग यांनी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. आपण विधानसभेचे सदस्य असताना तिवारी विरोधी पक्षनेते होते. आपण त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर ते उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला. आपण राज्याचे भवितव्य आहात, असे तिवारी या वेळी म्हणाल्याचे राजनाथ सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:53 am

Web Title: rajnath meets nd tiwari seeks blessing
Next Stories
1 भाजप व्यक्तिकेंद्रित विचारामध्ये गुरफटला – शुक्ला
2 दाऊदच्या प्रश्नावरून गृहमंत्र्यांवर मोदींची टीका
3 गुजरात प्रारुपापासून देवानेच वाचवावे
Just Now!
X