तृणमुल काँग्रेसचे बंडखोर नेते हृदय घोष यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या वडीलांची हत्या करण्यात आली होती.
घोष आणि इतरांनी अपक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढून विजही मिळवला. आता आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्याबाबत तारीख लवकरच निश्तीच करू असे घोष यांनी स्पष्ट केले. २१ जुलै रोजी निवडणुकीच्या आदल्यादिवशी रोजी हृदय यांचे वडील सागर यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तृणमुल काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आरोपी आहे. यामध्ये ४१ अन्य आरोपी आहेत. भाजपच्यावतीनेही घोष यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा देण्यात आला आहे. याबाबत लवकरत निर्णय घेतला जाईल असे दूधकुमार मंडल यांनी स्पष्ट केले.