वर्सोवा येथे एका स्वफ्ट गाडीमधून ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून गाडीचालकासह दोघांना अटक करण्यात आली. मात्र निवडणुकीशी या पैशांचा संबंध आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
अंधेरी पश्चिम येथील जुहू-सवरेवा लिंक रोडवरील ब्ल्यू लिफ हॉटेलजवळ नाकाबंदी सुरू असताना एमएच-०३-बीसी-५४७ क्रमांकाच्या स्वीफ्ट गाडीतून पोलिसांनी ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली. वाहनचालक संजीव कपलेश आणि अजित शिर्के या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीचालक आवश्यक ती कागदपत्रे सादर करू न शकल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या संदर्भात वर्सोवा पोलीस ठाण्यातील अधिकारी तपास करीत आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांबाबत आयकर विभागालाही माहिती देण्यात आली असून या विभागामार्फतही चौकशी करण्यात येत आहे.