देशात कधी नाही ते यावेळी माध्यमांमध्ये पैसे ओतून आर्थिक बळावर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
काही लोकांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी हवे आहेत. त्यामुळे भाजप पक्षाच्या नावावर नव्हे तर मोदींच्या नावावर मते मागितली जात असल्याचेही पवार म्हणाले. ते डोंबिवलीतील प्रचारसभेत बोलत होते.
मोदींबद्दल बोलताना पवारांनी यावेळी अनेक खळबळजनक आरोपही केले आहेत. माध्यमांना आतून पैसे दिल्यानेच बहुतेक वाहिन्या मोदींची थेट भाषणे रोज टेलिव्हिजनवर दाखवत असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच पंतप्रधानांचे भाषण आपल्याला ऐकायला मिळत नाही, पण पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींची भाषणे मात्र, रोज टेलिव्हिजनवर दाखविली जात असल्याचेही पवार म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 6:03 am