कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यास ते अर्ज रद्दबातल करावे, अशा आशयाची जनहित करण्यात आली असून त्याबाबत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत.
सरन्यायाधीश पी. सदाशिवम आणि न्या. एन. व्ही. रामन यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटिसा जारी केल्या आहेत. उमेदवारांनी एकाच वैधानिक संस्थेसाठी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरू नयेत आणि उमेदवारांनी अर्ज भरू नयेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. आपण एकाच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास उमेदवाराला सांगावे आणि त्याचे पालन न करणाऱ्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशा सूचना निवडणूक आयोगाने उमेदवाराला द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७ एप्रिल रोजी आसाम व त्रिपुरातील एका मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी शुक्रवारी निवडणूक अधिसूचना काढण्यात आली. तेजपूर, काळीबोर, जोरहाट, दिब्रुगड आणि लखीमपूर या आसाममधील जागांसाठी आणि त्रिपुरा (प.) मतदारसंघात ७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २१ मार्च असून दुसऱ्या दिवशी अर्जाची छाननी होणार आहे. देशातील १८ राज्यांमधील ९३ मतदारसंघांत ९ आणि १० एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात येणार आहे.