30 September 2020

News Flash

ममतांकडून घुसखोरांचे लांगूलचालन – मोदी

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याची जळजळीत टीका करत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्यावर

| May 4, 2014 02:09 am

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याची जळजळीत टीका करत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्यावर शरसंधान साधले. ममता यांना भाजपच्या गोटात आणण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यावर भाजपने ममता यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली आहे. मोदी यांच्याशी घरोबा केल्यास बंगालमधील २८ टक्के मुस्लिम मते तृणमुलपासून दुरावतील या शंकेमुळे ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांनंतर देखील भाजपच्या ‘एनडीए’ सोबत जाणार नसल्याचे जाहिर केल्यानंतर मोदी यांनी ममतांवर भाषणांमधून टीका करण्यास सुरूवात केली.
पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे प्रचारसभेमध्ये बोलताना मोदी यांनी ममता यांच्यावर टीकेटी झोड उठवली. “ममता बंगालची लुट सूरू असताना शांत होत्या. त्यांचे सरकार सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरले आहे. ‘संपुआ’ १ आणि ‘संपु्आ’ २ च्या वेळी ममता काँग्रेस आणि डाव्यांच्या बरोबरच होत्या. ममता बंगाल वाघांची वार्ता करतात. मात्र, दुसऱ्याबाजूला घुसघोरांचे लांगूलचालन करण्यात त्यांचे दिवस चालले आहेत.” असे मोदी म्हणाले.
तुम्हाला दुहेरी फायदा करून घ्यायचा असेल, तर मला दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहण मोदी यांनी यावेळी केले.                 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2014 2:09 am

Web Title: the mamata govt failed to do anything when bengal was being looted says modi
Next Stories
1 राज्यमंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादीची नोटीस
2 ‘सामना’च्या भूमिकेपासून शिवसेनेचे घुमजाव!
3 सरकारी योजनांपासून ‘राजकीय लाभार्थी’च वंचित
Just Now!
X