लोकसभा निवडणूकीतील राज्यातील तिसऱया टप्प्यातील एकूण १९ मतदारसंघात मतदानासाठी नेत्यांच्या प्रचाराचे ताबूत आज(मंगळवार) शांत झाले. गेले अनेक दिवस धडाधड असलेल्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी विसावल्या. प्रचाराची सांगता उमेदवारांच्या सभा, पदयात्रा, वैयक्तिक संपर्क या माध्यमातून झाली.
मुंबईत सर्व पक्षीय उमेदवारांनी मतदानाच्या आधी मिळालेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा प्रचारासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. सभा, मेळावे, पदयात्रा, प्रचार फेऱ्या, रोडशोचा चांगलाच धुरळा उडाला. मुंबईसह १९ मतदारसंघात २४ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस उरले आहेत.
राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने काँग्रेसने रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राहुल यांच्या भाषणामुळे काँग्रेसच्या प्रचारात जान आली होती, तर सोमवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर महायुतीच्या प्रचारासाठी भव्य सभा घेतली. त्यानंतर नंदुरबार, धुळ्यात आज सभा घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार केला. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनीही ठीकठीकाणी पदयात्रा, सभा घेऊन आपल्या प्रचाराची सांगता केली.
गुरूवार २४ एप्रिल रोजी राज्यातील १९ मतदार संघांतील प्रमुख लढती पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
महाराष्ट्रातील तिसऱया टप्प्यातील प्रमुख लढती..