07 July 2020

News Flash

आघाडीच्या खासदारांची दिल्लीत ‘चाटुगिरी’

पिण्याचे पाणी, रस्ते, कोळीवाडय़ांचा विकास असे अनेक प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. पण दिल्लीमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करण्यासाठी इथला एकही खासदार लोकसभेत उभा राहात नाही.

| April 16, 2014 04:22 am

पिण्याचे पाणी, रस्ते, कोळीवाडय़ांचा विकास असे अनेक प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. पण दिल्लीमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करण्यासाठी इथला एकही खासदार लोकसभेत उभा राहात नाही. हे खासदार गल्लीत दादागिरी आणि दिल्लीत चाटुगिरी करतात, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर सभेत केली.  
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्यावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आघाडीवर टीका करताना, दरवर्षी एकटय़ा मुंबईकडून दिल्लीच्या तिजोरीत दीड लाख कोटी रुपये जमा केले जातात. पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळते, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारवर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दोन वर्षांत आम्ही राज्य कर्जमुक्त करू, असे उद्धव म्हणाले. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा संपुष्टात आला आहे. त्यामुळे रेसकोर्ससाठी मुंबईबाहेर जागा देऊन महालक्ष्मी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान साकारण्याचा विचार होता. त्यामुळे पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ उपलब्ध झाले असते. पण इतिहासात रमायचे आणि भविष्यात काही करायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2014 4:22 am

Web Title: uddhav thackeray used bad word against congress mp
Next Stories
1 महिलांवर पाळत ठेवणारे मोदी त्यांचे सक्षमीकरण काय करणार?
2 ‘अशोकपर्वा’ची परीक्षा!
3 वाराणसीत मतांच्या ध्रुवीकरणाची सर्वानाच भीती
Just Now!
X