News Flash

विधान परिषदेसाठी २० जूनला मतदान

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षण मतदार संघात येत्या २० जून

| May 22, 2014 03:21 am

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षण मतदार संघात येत्या २० जून रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी आचाररंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, ज्या मतदारसंघात ही निवडणूक होत आहे त्या मतदारसंघापुरताच आचारसंहिता लागू असेल.
  नितीन गडकरी (नागपूर पदवीधर मदार संघ), वसंत खोराटे (अमरावती शिक्षक मतदार संघ), भगवान साळुंखे (पुणे शिक्षक मतदार संघ), चंद्रकांत पाटील (पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघ) आणि सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर मतदार संघ) यांचा कार्यकाल संपत आहे. रिक्त होणाऱ्या पाच जागांसाठी बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ जून ही उमेदवारी अर्ज दाखल  करण्याचा अखेरचा दिवस असेल. २० जूनला मतदान तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे.

खास प्रतिनिधी, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:21 am

Web Title: voting for legislative council on 20th june
टॅग : Legislative Council
Next Stories
1 मुंबईतील प्रश्नांवर खासदारांशी मुख्यमंत्र्यांची बैठक- सोमय्या
2 लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत नाही
3 आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रिपद?
Just Now!
X