07 July 2020

News Flash

मतदान हा महत्त्वाचा अधिकार

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही

| April 15, 2014 04:16 am

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.
चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते. त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे.
आपण कोण आहोत, आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊशकते, कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे, त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात, पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2014 4:16 am

Web Title: voting is an important rights nishat khan
Next Stories
1 काँग्रेसचा नारा ‘मैं नही मॉम’ असा हवा- अरुण जेटली
2 लढत वरवर सोपी; आतून अवघड
3 मन महाराष्ट्रातच रमते..
Just Now!
X