07 July 2020

News Flash

..तर मतदान केलेच पाहिजे

संपूर्ण जग बदलू म्हटले तर ते सहजशक्य नाही हे खरे आहे. पण, बदलाची सुरुवात कुठे तरी होईलच नं? त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

| April 22, 2014 12:05 pm

संपूर्ण जग बदलू म्हटले तर ते सहजशक्य नाही हे खरे आहे. पण, बदलाची सुरुवात कुठे तरी होईलच नं? त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. एक मत दिले नाही म्हणून काय फरक पडणार आहे, असे आपले म्हणणे असते. पण, प्रत्यक्षात एकेक थेंब मिळूनच समुद्र होत असतो. भले तो होण्यासाठी काही वेळ लागत असेल. तीच गोष्ट आपल्या मतांची आहे. आपल्या प्रत्येकाचे एकेक मत मिळूनच मताचा सागर होईल आणि देशाचे भवितव्य बदलेल. पण, त्यासाठी मुळात मतदान करणे गरजेचे आहे. नव्हे ते फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर आपल्या परिस्थितीत आणि देशात बदल व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता ते महत्त्वाचे ठरतात. मतदान हा बदलाचा चांगला आणि लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मार्ग आहे. त्याचा पुरेपूर उपयोग आपण केला पाहिजे. बदल घडवून आणायचा असेल तर आपण सर्वानी मिळून मतदान केलेच पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2014 12:05 pm

Web Title: we must vote for change sonali bendre
Next Stories
1 पुण्यातील मतदारांची नावे गहाळ : : संबंधितांवर कारवाईसाठी याचिका
2 मोदींची वैवाहिक स्थिती : निवडणूक आयोगाकडून तक्रारीची छाननी
3 मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचणे ही जबाबदारी- नरेंद्र मोदी
Just Now!
X