पक्ष कार्यकर्त्यांकडून धमकावल्याप्रकरणी प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करावी, अशी मागणी आपचे उमेदवार कुमार विश्वास यांनी केली. १५ एप्रिल रोजी जेव्हा प्रियंका गांधी यांची अमेठीच्या दौऱ्यावर काँग्रेस कार्यकर्ता विनोद मिश्रा याच्याशी झालेल्या संभाषणाच्या चित्रफीतीत विश्वास हे राहुल विरोधात बोलत असून मी त्यांना गोळी मारीन, असे त्या बोलल्या, असा आरोप आहे.