वर्धा जिल्ह्य़ातील एका शेतकऱ्याचे पीककर्ज बँकेने वसूल केले. पंतप्रधान योजनेंतर्गत त्याचे कर्ज माफ झाले, तरी बँक अथवा पूर्ती साखर कारखान्याने शेतकऱ्याला ते परत केले नाही. अशा पद्धतीने ही रक्कम हडपून पूर्ती साखर कारखान्याने गैरप्रकार केल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या आरोपासंबंधीचे निवेदन दुपारीच नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी नेऊन दिले होते. दुपारी चार वाजेपर्यंत त्यांनी खुलासा केला नसल्याने राजकारणातून संन्यास घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.