पतियाळा शहर दंडाधिकाऱ्यांचा निर्णय अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गेल्यास त्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत जामिनासाठी बद्धपत्र (बाँड) व जातमुचलक्याची रक्कम भरणार नाही, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. मात्र पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेत पक्षनेते योगेंद्र यादव यांनी ५ हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्याची रक्कम भरून जामीन मिळवला आहे.केजरीवाल यांनी गुरुवारी पत्नी आणि आपच्या नेत्यांची भेट घेतली. केजरीवाल संजय सिंग आणि आशुतोष, तसेच पत्नी सुनीता यांना सुमारे अध्र्या तासासाठी भेटल़े ़  मानहानीच्या दाव्यात जामीन घेण्याचे नाकारल्यानंतर केजरीवाल  तिहार तुरुंगात आहेत़