कर्नाटकमधील वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयएएस अकादमीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात झालेल्या मार्गदर्शन शिबीराच्या वेळी बोलताना ठाकरे यांनी कर्नाटकच्या दडपशाहीबद्दल मतप्रदर्शन केले. वरिष्ठ पोलिस अधिकारी पारस्कर यांच्याविरोधातील मॉडेलच्या कथित तक्रारीबाबत बोलतानाही त्यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील भूमिकेचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचेही स्पष्ट केले.
भाजपप्रमाणेच शिवसेनाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडीयावर भर देणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्याचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.