राष्ट्रीय योग अॅम्बेसेडर बाबा रामदेव व राष्ट्रीय जावई रॉबर्ट वढेरा यांची कुंडली एकदम सारखी आहे. दोघांच्याही हातून काँग्रेसला नुकसान होईल, असे कुंडलीत लिहिले आहे. काय तर म्हणे बुध प्रभावी आहे. शनी पराक्रमी आहे. हा शनी काँग्रेसला वक्री आहे. वगैरे वगैरे..! बाबा रामदेव यांनीच योग बाजूला ठेवून कुंडली मांडण्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. बाबा जे भविष्य सांगतील ते भलेभलेही ऐकतात. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांच्या छिंदवाडय़ात बाबा रामदेव यांचा कार्यक्रम होता. बाबांना काय कुठेही कार्यक्रम करतील. कारण बाबा जिथे जातील तिथे ‘कमळनाथ’ त्यांच्या साथीला असतो. मग बाबा वाट्टेल ते करतात. म्हणून बाबांनी भविष्य सांगायला सुरुवात केली. पहिला नंबर राहुल गांधींचा. देशाच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या म्हणजे राहुल गांधी यांचे लग्न. बाबांनी सांगितले, राहुल गांधींच्या कुंडलीत विवाह योग नाही. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करू नये. आता हे जरा अतिच होतं. पण बाबा रामदेव म्हटल्यावर विश्वास ठेवणं आलंच. बरं सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची काळजीही बाबा रामदेव यांनाच. तब्येत बरी नसेल तर ‘लोम-विलोम’ करायला या, लगेच ठीक होईल, बाबांचा सल्ला. आता उरले रॉबर्ट वढेरा. रॉबर्ट वढेरा गांधी कुटुंबात आल्यापासून काँग्रेसच्या राशीत ‘दशमग्रह’ आला. हा दशमग्रह काँग्रेसला संपवणार आहे. बाबा बोलून गेले, पण तिकडे १० जनपथवर चुळबूळ सुरू झाली. बाबांचा बोलाविता धनी कोण, याविषयी चर्चाचर्वण सुरू झाली. बाबा रामदेव यांना ‘कमळनाथ’ पावले की मग एकेकाच्या कुंडल्या उघडणार आहेत म्हणे! ही गुजरातच्या प्रसिद्ध ज्योतिष्याची भविष्यवाणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
कुंडली- बाबा रामदेव आणि रॉबर्ट वढेरांची!
राष्ट्रीय योग अॅम्बेसेडर बाबा रामदेव व राष्ट्रीय जावई रॉबर्ट वढेरा यांची कुंडली एकदम सारखी आहे. दोघांच्याही हातून काँग्रेसला नुकसान होईल, असे कुंडलीत लिहिले आहे.

First published on: 29-03-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi chat horoscop of baba ramdev and robert vadra