माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग भाजपात

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी त्यांच्या वयाच्या वादावरून सरकारशी बरीच लढाई केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी त्यांच्या वयाच्या वादावरून सरकारशी बरीच लढाई केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून तो सत्तेवर यावा असे आपल्याला वाटते असे व्ही.के.सिंग यांनी म्हटले आहे. जनरल सिंग यांनी काही माजी सैनिकांसह पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सैनिकांनी स्थिर, मजबूत व राष्ट्रवादी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा द्यावा असे सांगून व्ही.के.सिंग म्हणाले की, भाजप हाच राष्ट्रवादी विचारसरणीचा पक्ष आहे त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश करीत आहोत.  व्ही.के.सिंग हे मे २०१२ मध्ये लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. सैनिकांच्या उत्साहाने भाजप मजबूत होईल. व्ही.के.सिंग यांचे भाजपमध्ये स्वागत करताना राजनाथ सिंग म्हणाले की, जर भाजप सत्तेवर आला तर लष्करी दलांची चांगली काळजी घेईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former army chief general vk singh joins bjp

ताज्या बातम्या