मायावती यांचे रविवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन

लोकसभा निवडणुकीतील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती रविवारी १३ एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकसभा निवडणुकीतील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती रविवारी १३ एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. औरंगाबाद व मुंबईत त्यांच्या सभा होणार आहेत. मायावती यांची रविवारी सकाळी पहिली सभा औरंगाबादला होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. एक लाखाची ही सभा होईल, अशी माहिती बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mayawati in mumbai on sunday