संपूर्ण गुजरात दहशतवाद्यांचे तळ- मायावतींचे अमित शहांना प्रत्युत्तर

उत्तरप्रदेशातील आझमगढ हे ठिकाण दहशतवाद्यांचा अड्डा झाल्याचे विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते अमित शहा यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी सडकून टीका केली.

उत्तरप्रदेशातील आझमगढ हे ठिकाण दहशतवाद्यांचा अड्डा झाल्याचे विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते अमित शहा यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी सडकून टीका केली.
मायावती म्हणाल्या, नेमकेपणाने पहायचे झाल्यास संपूर्ण गुजरात राज्य दहशतवाद्यांचा तळ झाल्याचे मी म्हणेन. आझमगड येथील सगळ्यात मोठा दहशतवादी म्हणजे येथील भाजपचे उमेदवार रमाकांत यादव हे आहेत. मी स्वत: त्यांची बसपमधून हकालपट्टी केली होती, संपूर्ण आझमगडमध्ये यादव यांची दहशत आहे.” असेही त्या म्हणाल्या. तसेच उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागामध्ये येण्यावर शहा यांना मनाई करावी, अशी मागणीही मायावती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शहा यांच्याबरोबर नेहमी वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यावरही उत्तर प्रदेशात येण्याची बंदी घालण्यात यावी असेही त्या म्हणाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mayawati slams shahs remarks against azamgarh

ताज्या बातम्या