बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तारिक अन्वर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना खासदारकीसाठी संधी दिली जाणार आहे.
तारिक अन्वर यांची राज्य विधानसभेतून  जुलै २०१० मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती. या जागेवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेल यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. २ ते ९ जून या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जूनपर्यंत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या प्रकाश जावडेकर यांना मध्य प्रदेशमधून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, तेथून जावडेकर यांना निवडून आणले जाणार आहे. जावडेकर हे सध्या संसदेच्या उभय सभागृहांचे सदस्य नाहीत.