गेल्या चार वर्षांपासून लातूर शहराच्या नजीक बंदिस्त शेळीपालनाचा अतिशय अभिनव उपक्रम ‘सुपर गोट फार्म’ या नावाने फिरोज मिनियार या दहावी शिकलेल्या तरुणाने सुरू केला. डिसेंबर २०११ साली दोन एकर जमिनीवर मोठी शेड उभारून ७०० शेळ्या बंदिस्त केल्या होत्या. तेव्हा शासनाचे या प्रकल्पासाठी अनुदानही नव्हते. नव्या प्रयोगात शेळीच्या जाती बदलल्या. मूळच्या राजस्थान प्रांतात विकसित झालेल्या शिरोही या जातीच्या शेळ्या त्यांनी संगोपनासाठी आणल्या. प्रारंभी शेळीपालनाबाबत कोणाला माहिती हवी असेल तर तो मोफत सल्ला देत असे, मात्र त्यात वेळ अधिक जाऊ लागला व भेटणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. त्यावर उपाय म्हणून त्याने माहिती देण्यासाठी ५०० रुपये शुल्क ठेवले.

कोणी कितीही महत्त्वाचा सल्ला दिला अन् तो फुकट असेल तर त्याचे महत्त्व फारसे वाटत नाही. एखादी व्यक्ती महत्त्वपूर्ण माहितीही सांगत असली तरी त्याकडे म्हणावे तसे गांभीर्याने लक्ष दिले जातेच असे नाही. आपण पसे मोजले असतील तर मग मात्र सांगणाऱ्याचा शब्द न् शब्द ऐकण्याकडे कल असतो.

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
ग्रामविकासाची कहाणी
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

गेल्या चार वर्षांपासून लातूर शहराच्या नजीक बंदिस्त शेळीपालनाचा अतिशय अभिनव उपक्रम ‘सुपर गोट फार्म’ या नावाने फिरोज मिनियार या दहावी शिकलेल्या तरुणाने सुरू केला. प्रारंभी कोणाला माहिती पाहिजे असेल तर तो मोफत सल्ला देत असे, मात्र त्यात वेळ अधिक जाऊ लागला व फुकटची माहिती मिळते म्हणून भेटणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. त्यावर उपाय म्हणून त्याने माहिती हवी असेल तर ५०० रुपये शुल्क ठेवले अन् ज्याला माहिती हवी आहे अशी गरजूच मंडळी त्याच्याकडे येऊ लागली. गेल्या चार वर्षांत सुमारे पाच हजार मंडळींनी ५०० रुपये भरून या उपक्रमाची माहिती घेतली अन् त्यातील बहुतांश जणांनी त्या ज्ञानाचा उपयोग कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. लातूरच्या मिनियारने असे काय केले आहे की ज्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतांतील मंडळी स्वत: प्रवासखर्च करून वर ५०० रुपये शुल्क देऊन हा प्रयोग पाहतात.

मिनियार कुटुंबाचा पारंपरिक बांगडी व लहान मुलांच्या तयार कपडय़ाचा व्यवसाय आहे. शहराच्या जवळ सहा किलोमीटर अंतरावरील कोळपा येथे १५ एकर जमीन आहे. २००५ पर्यंत जमिनीच्या उत्पन्नासाठी व्यवसायातून फारसे पसे घालावे लागत नसत. दर वर्षी काही ना काही नफा मिळत असे, मात्र त्यानंतर पाऊस कमी झाला व जमिनीतून उत्पन्न मिळण्याऐवजी व्यवसायातून मिळविलेले पसे जमिनीसाठी खर्च करावे लागू लागले. कुटुंबात ६० ते ७० लाख रुपये दराने जमीन विकली जात असेल तर ती विकून व्यवसायात गुंतवणूक करावी अशीही चर्चा झाली मात्र पिढय़ान् पिढय़ांची ठेव असणारी जमीन न विकता शेतीला पूरक व्यवसाय काय करता येईल? याचा शोध सुरू झाला.

कुक्कुटपालन, दूध डेअरी व शेळीपालन हे तीन पर्याय प्रारंभी होते. बऱ्याच चच्रेनंतर शेळीपालन सुरू करण्याचा विचार झाला व त्यानंतर फिरोजने महाराष्ट्रातील व परप्रांतातील सुमारे ८५ शेळीपालन केंद्रांना भेटी दिल्या. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्ची पडले व त्यानंतर बंदिस्त शेळीपालन उपक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी केलेल्या प्रयोगातून जन्मणारी शेळीची पिले यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यामुळे हा व्यवसायही आतबट्टय़ाचा होऊ लागला. तेव्हा हा व्यवसाय बंद करावा असा विचार मनात आला असताना फिरोजच्या वडिलांनी व्यवसाय बंद करण्यापेक्षा नेमक्या चुका काय आहेत याचा शोध घेऊन त्या दुरुस्त केल्या तर व्यवसायात नक्की प्रगती होईल, असा सल्ला दिला व नव्या उमेदीने फिरोजने व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.

डिसेंबर २०११ साली दोन एकर जमिनीवर मोठी शेड उभारून ७०० शेळ्या बंदिस्त केल्या होत्या. तेव्हा शासनाचे या प्रकल्पासाठी अनुदानही नव्हते. नव्या प्रयोगात शेळीच्या जाती बदलल्या. मूळच्या राजस्थान प्रांतात विकसित झालेल्या शिरोही या जातीच्या शेळ्या त्यांनी संगोपनासाठी आणल्या. अतिशय उष्ण व अतिशय थंड या दोन्हीही तापमानांत ही जात टिकू शकते. देशभरात शेळ्यांच्या २२ प्रकारच्या जाती आहेत. बिटेल, जमनापाटी, तोतापुरी, नागफणी, सोजत अशा अनेक जाती आहेत. शिरोही जात येथील हवामानाला टिकून राहिली. या जातीसाठी दर दिवशीचा खुराक ३०० ग्रॅम, ज्यात मका, हरभरा व तुरीचे भरड यांचे मिश्रण, शिवाय तीन किलो हिरवा चारा व एक ते दीड किलो कोरडा चारा लागतो. हिरव्या चाऱ्यात मका, कडोळ, डीएन ६, दशरथ, मेथी जातीचे गवत, कोरडय़ा चाऱ्यात सोयाबीन, हरभरा, तूर याची गुळी किंवा जोंधळा, हायब्रीडचा कडबा. अर्थात सर्व चारा कडबाकुट्टीतून काढून तो बारीक करून दिला तर चाराही वाचतो आणि त्याचा योग्य लाभ शेळ्यांना होतो. एक शेळी सात महिन्यांनंतर पिलाला जन्म देते. सरासरी शेळीचे आयुष्य आठ वष्रे आहे. तिच्या आयुष्यात ती एका वेळेला कधी दोन पिले तर कधी एका पिलास जन्म देते. अंदाजे १५ पिलांना ती जन्म देते. सध्या ४०० रुपये किलो मटनाचा भाव आहे. त्याच्याच वजनानुसार शेळीची किंमत ठरते. शेळी सरासरी एक ते दीड लिटर दूध देते. हे दूध पूर्णपणे पिलांना दिल्यामुळे पिलांची वाढ मोठय़ा प्रमाणावर होते. वर्षभरात चार वेळा शेळीचे लसीकरण करावे लागते. शासकीय यंत्रणेत केवळ पाच रुपयांना ही लस उपलब्ध आहे. एका शेळीला वर्षांकाठी फक्त २० रुपये खर्च लागतो.

मिनियार यांनी फलटणच्या निमकर सिड्स यांनी विकसित केलेल्या ऑस्ट्रेलियन बोअर जातीच्याही काही शेळ्या आपल्या शेळीपालन केंद्रात आणल्या आहेत. या शेळीची किंमत किलोला तीन हजार ५०० रुपये इतकी आहे. चांगले संगोपन केल्यास नराची वाढ वर्षभरात ४० ते ४५ किलोत होते व त्याची किंमत १ लाखांपर्यंत मिळते. आपल्या केंद्रात दोन वष्रे सांभाळलेल्या एका नराचे वजन तब्बल १०० किलो भरल्याचेही फिरोजने सांगितले. मिनियार यांनी आपल्या केंद्रात सुमारे ८५० शेळ्या पाळल्या आहेत. यासाठी ५५० फूट लांब व ३० फूट रुंदीची शेड करण्यात आली आहे. एखाद्या शाळेत बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक असा स्वतंत्र विभाग असतो त्या पद्धतीने वयानुसार शेळ्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या वयानुरूप चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था, दिवसातून चार वेळा चारा दिला जातो. पाणी कायम उपलब्ध असते व स्वच्छतेची इतकी काळजी घेतली जाते की, आपण शेळीपालन केंद्रात आलो आहोत असे वाटत नाही. शेळीची विष्ठा व साफसफाई झाल्यानंतरचे पाणी स्वतंत्रपणे गोळा करण्याची व्यवस्था केली आहे व त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. १० एकर जमिनीवर टप्प्याटप्प्याने चारा लावला जातो. सोयाबीन, तूर, ज्वारी, आदींचे विक्रमी उत्पादनही त्यातून मिळते. रासायनिक खते, औषधांची गरज भासत नाही. मिनियार यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेल्या चार वर्षांत मध्य प्रदेश, रत्नागिरी, गोवा, विदर्भ, नाशिक अशा विविध ठिकाणी बंदिस्त शेळीपालन सुरू आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी दूरध्वनीवरून सल्ला देऊन सोडवल्या जातात.

आíथक अडचणीत सापडलेली शेती आता चांगलीच फायद्याची झाली असून दर वर्षी खर्च वजा जाता सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिनियार यांना मिळते आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा उभा केला पाहिजे. बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करता येते. गेल्या १५ वर्षांत मटनाचे भाव १२० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. भाव कधीही कमी झाला नाही. एटीएममधून जसे केव्हाही पसे काढता येऊ शकतात तसे गरजेनुसार शेळीची पिले अथवा नर बाजारात नेऊन विकून पसे मिळतात. बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर त्याला ग्राहक मिळाले नाही असे कधीही घडत नसल्याचे मिनियार म्हणाले.

शेळीपालन हा शेतीपूरक व हक्काचे उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायाकडे जितके शेतकरी वळतील तितके कमीच आहेत. कारण मटनाची मागणी मोठी असून ती देशांतर्गत बाजारपेठेत भरून निघत नसल्यामुळेच दर वर्षी यात भाववाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेळीची भाषा समजून घेतली पाहिजे

शेती करताना शेतीची भाषा कळावी लागते. शेतात गेल्यावर नेमकी शेती कोणते काम सांगते हे समजून घेता आले पाहिजे

त्याच पद्धतीने शेळीपालन करताना शेळीशी नाते जोडले गेले पाहिजे, असे सांगत मिनियार म्हणाले, ८५० शेळ्यांना कोणताही आजार झाला तरी आपण स्वत:च उपचार करतो. प्रारंभी त्याची थोडीशी माहिती घेतली व आता प्रत्येक आजाराची माहिती आपल्याकडे आहे. गेल्या चार वर्षांत एकदाही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेळी आजारी पडली म्हणून बोलवण्याचा प्रसंग आला नसल्याचे ते म्हणाले.

pradeepnanandkar@gmail.com