पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात नवी पीक विमा योजना जाहीर केली असून ही योजना यंदा जूनपासून अमलात येईल.
’ शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि देशात तो कुठेही विकता यावा यासाठी कृषी बाजारपेठा संगणकाने जोडण्यात येणार आहेत.
’ शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करावी, असे पंतप्रधानांचे आवाहन.
’ या योजनेनुसार शेतकऱ्यांना मोबाईल फोनच्या आधारे देशात ज्याठिकाणी दर जास्त आहे तेथे माल विकता येईल.
’ आतापर्यंत अनेक पीक विमा योजना आल्या. मात्र, शेतकऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेत किमान ५० टक्के शेतकरी सहभागी होतील, अशी पंतप्रधानांना अपेक्षा.