10 April 2020

News Flash

शेतकऱ्याला तारणारा ‘शेतखड्डा’

एवढय़ा कमी क्षेत्रातील जमीन पुन्हा शेततळय़ात गुंतवायची तर ते त्या शेतकऱ्याला परवडत नाही.

शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याचे स्रोत वाढवल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणी वाढवण्याचे विविध प्रयोग केले जात आहेत. विहीर, िवधनविहीर, तलाव, धरण याबरोबरच शेततळीही घेतली जातात. याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतीचे क्षेत्र घटत आहे. या घटत्या क्षेत्रातील जमीन पुन्हा शेततळय़ात गुंतवायची तर ते त्या शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेततळय़ांना प्रतिसाद मिळत नाही. यवतमाळचे डॉ. अविनाश शिर्के यांनी यावर गेल्या दोन वर्षांत एक अभिनव उपक्रम राबवला असून या उपक्रमाला त्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला अन् त्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढली.

शेतीत सिंचनाचे प्रयोग वर्षांनुवष्रे सुरू आहेत. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याचे स्रोत वाढवल्याशिवाय उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी वाढवण्याचे विविध प्रयोग केले जात आहेत. विहीर, िवधनविहीर, तलाव, धरण याबरोबरच गेल्या काही वर्षांत शेततळे घेतली जातात. याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतीचे क्षेत्र घटत असल्यामुळे शेतकऱ्याला सरासरी तीन एकरच जमीन स्वत:च्या मालकीची आहे. एवढय़ा कमी क्षेत्रातील जमीन पुन्हा शेततळय़ात गुंतवायची तर ते त्या शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेततळय़ांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. यवतमाळचे डॉ. अविनाश शिर्के यांनी यावर गेल्या दोन वर्षांत एक अभिनव उपक्रम राबवला असून या उपक्रमाला त्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला अन् त्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढली, पाणी वाढले व पर्यायाने शेतीचे उत्पन्न वाढले. नेमका हा प्रयोग काय हे समजून घेणे अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. शिर्के हे सावित्रीबाई जोतिराव समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. पाणलोट क्षेत्र विकास या विषयात ते गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. आपल्याकडे पाणलोट क्षेत्र विकासाचे काम म्हणजे एक तर माथ्यावर किंवा पायथ्यावर केले जाते. दोन्ही बाबतीत केलेल्या कामाचा लाभ नक्की होतो. मात्र, माथ्यावरील जी शेती असते तेथे काळय़ा मातीचे प्रमाण कमी असते व पायथ्यावर होणाऱ्या कामाचा लाभ जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून अनेकांना मिळाला आहे. या पद्धतीच्या कामामध्ये अति पाऊस झाला की दोन ते तीन वर्षांत माती साठते व ही साठवण पुन्हा निरुपयोगी ठरते किंवा पावसामुळे फुटून जाते. विदर्भ, मराठवाडय़ात ८५ टक्क्य़ांच्या आसपास कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीत जर पाणी उपलब्ध झाले तर खरिपात याचा फारसा लाभ होत नाही. काही प्रमाणात रब्बी हंगामात याचा लाभ घेतला जातो. विहिरीतील पाण्याचा लाभ घेणारे शेतकरी ५ ते ७ टक्के आहेत. शेतीत बांध घालणे व शेततळे तयार करून त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करणारे शेतकरी आहेत. फडणवीस सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली असली तरी या योजनेसाठी मिळणारे अनुदान व त्यासाठी गुंतून पडणारी जमीन याचे प्रमाण अतिशय व्यस्त असते. शेततळय़ाला लागणारा पसा अनुदानाच्या किमान दुप्पट लागतो शिवाय जमीन गुंतून पडते. जमिनीचे क्षेत्र कमी असेल तर शेततळे करणे परवडत नाही.

राज्यात यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. त्याचबरोबर याच जिल्हय़ातील शेतकऱ्यांनी शेतीत विविध प्रयोग केले आहेत, ते पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक यवतमाळला येतात. सुभाष शर्मा या शेतकऱ्याने २० बाय १० बाय १० फूटच्या आकाराचा शेतखड्डा तयार केला. हा खड्डा तयार करताना जमिनीत कंटुर पद्धतीने छोटे बांध घातले. ज्यामुळे पाणी त्या त्या ठिकाणी अडले व तयार केलेल्या खड्डय़ात केवळ पाणी आले. एक कणही गाळ आला नाही. कंटुर पद्धतीने लायिनग केल्यामुळे जमिनीत पाणी मुरले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. शिवाय जे अतिरिक्त पाणी खड्डय़ात जमा झाले त्याचा वापर जेव्हा पिकांना पाण्याचा ताण पडतो तेव्हा करता येऊ लागला. एक हेक्टर जमिनीत किमान एक खड्डा तयार केला तर त्याचा योग्य लाभ शेतकऱ्याला मिळतो.

टाटा सामाजिक संस्थेने या उपक्रमासाठी तांत्रिक मार्गदर्शन व आíथक साहाय्य देऊ केले. १० हजार रुपये एका खड्डय़ासाठी अनुदान दिले व शेतकऱ्यांनी २ हजार रुपयांचा लोकवाटा उचलला. त्यातून मोठय़ा प्रमाणात असे शेतखड्डे घेण्यास सुरुवात झाली. मधुकर खडसे हे अमरावतीतील ८३ वर्षांचे अभियंते. त्यांनी यासाठी तांत्रिक साहाय्य केले. त्यांच्या अनुभवाचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला व हळूहळू यवतमाळ जिल्हय़ात शेतखड्डे घेण्याकडे लोकांचा कल वाढला. चौकी गावातील सुरेश लांडगे या शेतकऱ्याने आपल्या शेतात हा खड्डा घेतला. त्यांना उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढले. यावर्षी रब्बी हंगामात पाच एकर क्षेत्र असलेल्या या शेतकऱ्याने गहू पेरला व त्याला या शेतखड्डय़ातील पाणी दिले आहे. सुरेश लांडगे यांचा हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गावातील २० शेतकऱ्यांनी लोकसहभागातून असे खड्डे तयार केले आहेत. यवतमाळ जिल्हय़ात आता सुमारे २५० शेतखड्डे शेतकऱ्यांनी घेतले आहेत.

शेतकऱ्यांनी शेतखड्डय़ाच्या मोहिमेत सहभाग दिल्यामुळे त्यांना याचा चांगलाच लाभ होतो आहे. चौकी येथील सुरेश लांडगे या शेतकऱ्याने गतवर्षी शेतखड्डा घेतला. १५, १६, १७ जून असे तीन दिवस सलग पाऊस झाला. या पावसामुळे जमिनीत पाणी मुरले व शेतखड्डय़ातही साठले. त्यानंतर थेट २६ जुलपर्यंत पाऊस झाला नाही. लांडगे यांनी १८ जून रोजीच पेरणी केली व त्यानंतर शेतखड्डय़ातील पाणी तुषार सिंचनने दिले. त्यामुळे तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. खडसे हे या कामात गुंतलेले आहेत. या उपक्रमामुळे पाणी अडते, शिवाय शेतातील माती शेतातच राहते. शेतकऱ्यांना याचे महत्त्व आता पटू लागल्यामुळे कमी खर्चात अधिक लाभ होत असल्यामुळे या नव्या उपक्रमावर त्यांचा विश्वास बसत असल्याचे ते म्हणाले.

सलीम काझी हे सामाजिक वनीकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. तेही या उपक्रमात सहभाग देत आहेत. या संरक्षित सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना होतो आहे. जलसंधारणाचा हा वेगळा आदर्श आता संपूर्ण विदर्भाबरोबर मराठवाडय़ातील शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचण्याची गरज आहे. शेततळय़ाच्या उपक्रमात मोठे शेतकरी सहभागी होतात. मात्र छोटय़ा शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही किंवा त्या योजनेत सहभागी होणे त्यांना परवडत नाही. शेतखड्डय़ाच्या योजनेत सरकारने सहभाग दिला तर छोटय़ा शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. शिवाय शेतकऱ्यांची शेती लक्षात घेऊन कोणत्या ठिकाणी शेतखड्डा घ्यायला हवा व कशा पद्धतीने कंटुर लायिनग करावे याचे तांत्रिक मार्गदर्शनही दिले गेले पाहिजे, असे काझी म्हणाले. कोरडवाहू शेतीत अधिक उत्पन्न काढता येणाऱ्या या शेतखड्डय़ाच्या उपक्रमाला राज्यभर वाव देण्याची गरज आहे.

  • वरूड, सुकणी, चौकी, मुरझडी, गणेशपूर या गावातील लोक उपक्रमात मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले आहेत.
  • काही शेतकऱ्यांनी २ हजारांच्या ऐवजी ३ ते ४ हजार रुपयेही यात गुंतवले आहेत. या शेतखड्डय़ासाठी अतिशय कमी जमीन लागते. शेतखड्डय़ात गाळ येत नसल्यामुळे पुन्हा वेगळा खर्च करावा लागत नाही व प्रत्येक ठिकाणी पाणी अडवण्यासाठी टाकलेल्या बांधामुळे शेतीत पाणी मुरते. पर्यायाने पाण्याची पातळी वाढते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन ढाळी बांध टाकले जातात. यातून मातीचा पोत टिकून राहतो व माती वाहून जात नाही.
  • उताराच्या जमिनीवर काही शेतकरी ज्वारी, यशवंत गवत घेतात. त्यामुळेही माती टिकून राहते. बांधावर वेलवर्गीय पिके घेतली जातात व आतील बाजूस पेरू, सीताफळ, आवळा अशी कमी पाण्यावर येणारी फळझाडे लावली जातात.
  • यंत्राच्या माध्यमातून शेतखड्डा केला तर त्याचा खर्च १० हजार रुपयांपेक्षाही कमीच येतो. यवतमाळ जिल्हय़ात एकूण जमिनीचे क्षेत्र १३ लाख ५० हजार हेक्टर असून त्यापकी ९ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखालचे आहे. एकूण जमिनीच्या ६९ टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2017 12:20 am

Web Title: farm digged
Next Stories
1 ‘हुरडा’ शेती फायद्याची!
2 शेतकरीही ‘कोरडवाहू’च!
3 दुष्काळी भागातील द्राक्ष शेती
Just Now!
X