17 December 2017

News Flash

दुष्काळी भागातील द्राक्ष शेती

दोन-चार वर्षांला पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते.

वसंत मुंडे | Updated: February 4, 2017 12:21 AM

चौसाळा येथील निवांत शिंदे या तरुण शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीत शेतीमध्ये नवा प्रयोग करण्याचा नशिं्चय केला. सोलापूर जिल्ह्य़ातील काही द्राक्ष बागायतीची पाहणी करून दोन एकरमध्ये द्राक्ष बागायत करण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी काही अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी पाण्यावर मांडव पद्धतीने आणि नऊ बाय पाचच्या अंतराने लागवड करून ठिबकवर हजार रोपांची बाग उभी केली.

दोन-चार वर्षांला पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. शेतीसाठी पाणी साठवणाऱ्या पुरेशा प्रकल्पांचा अभाव असल्याने बहुतांशी शेतकरी खरीप आणि एका पावसावरील रब्बी पीके घेण्यातच धन्यता मानतात. परिणामी नव्या पद्धतीच्या शेतीच्या पिकांचा विचारच केला जात नाही. पश्चिम महाराष्ट्रात कमी शेती असणारे शेतकरीही आर्थिकदृष्टय़ा कसे संपन्न आहेत? याच्या कथा मात्र पारावर रंगतात पण नवा प्रयोग करण्याची िहमत कोणी करत नाही. पिण्यासाठी टँकरवर अवलंबून असणाऱ्या चौसाळा येथील निवांत शिंदे या तरुण शेतकऱ्याने मात्र प्रतिकूल परिस्थितीत शेतीमध्ये नवा प्रयोग करण्याचा नशिं्चय केला.

सोलापूर जिल्ह्य़ातील काही द्राक्ष बागायतीची पाहणी करून आपल्या दोन एकरमध्ये द्राक्ष बागायत करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाणी नसताना आणि द्राक्षवाढीसाठी पूरक वातावरण नसताना हा प्रयोग करणे कसे जोखमीचे आहे याबाबत त्यांना अनेकांनी फुकटचे सल्लेही दिले. पण शिंदे यांनी काही अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी पाण्यावर मांडव पद्धतीने आणि नऊ बाय पाचच्या अंतराने लागवड करून ठिबकवर हजार रोपांची बाग उभी केली. अवघ्या सात वर्षांत तब्बल सात एकरमध्ये लागवड करून शिंदे द्राक्ष बागायतदार झाले असून वर्षांकाठी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न  मिळवत दुष्काळातही योग्य नियोजनाने बाग टिकवून ठेवण्याची किमया त्यांनी केली हे वशिंेष.

बीड जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर असलेले चौसाळा हे तसे ग्रामीण बाजारपेठ असलेले गाव. शिवार सपाट असला तरी कापूस, तूर, मूग, उडीद आणि काही प्रमाणात ऊस या पारंपरिक शेतीशिवाय फारसे काही पिकत नाही. शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित शेती मोठी असली तरी अपुरा पाऊस आणि दर दोन-तीन वर्षांनी पडणारा दुष्काळ यामुळे पारंपरिक पिके घेऊन निघेल त्या उत्पन्नावर गुजराण करणे यातच धन्यता मानली जाते. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता आणि शेतीच्या आधुनिकतेमुळे एका एकराचा शेतकरीही कसा आर्थिकदृष्टय़ा संपन्न असतो याच्या कथा पारावर रंगतात. पण आपल्या शेतीत कोणी नवा प्रयोग करण्याची िहमत करत नसल्याने वर्षांनुवर्षे अपुऱ्या पावसाला आणि मुबलक पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे नशिबाला दोष देत शेतकरी हतबलता व्यक्त  करतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात पिण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावातील निवांत गणपतराव शिंदे या तरुण शेतकऱ्याने सात वर्षांपूर्वी शेतीत द्राक्ष बाग करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी, पंढरपूर या ठिकाणच्या द्राक्ष शेतीला भेट देऊन अभ्यास केला. अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आणि पाण्याची कमी उपलब्धता असताना एक एकरवर साडेसहा हजार रोपांची लागवड केली. मांडव पद्धत आणि वाय पद्धतीने लागवड करून बाग वाढवली. वर्षांला चांगले उत्पन्न  निघाल्यानंतर पुन्हा एक एकर वाढवून आता तब्बल सात एकरमध्ये द्राक्षाची बाग फुलली. परिणामी शिंदेही आता या परिसरात द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

बीड जिल्हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने फळबाग करण्याकडे शेतकरी फारशी िहमत करत नाहीत. द्राक्षाची शेती तर दिसतच नाही. पण निवांत शिंदे यांनी या सर्व पारंपरिक शेतीला फाटा देऊन द्राक्षाची शेती यशस्वी केली. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक शेतकरी आता शिंदे यांची द्राक्षाची शेती पाहण्यासाठी येत आहेत. दुष्काळात मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. खासगी संस्था, जलयुक्त  शिवारच्या माध्यमातून पाणी साठे निर्माण झाले.

यंदा परतीचा पाऊसही चांगला झाला. परिणामी पाण्याची उपलब्धता सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून ठिबक पद्धतीचा वापर करत फळबाग शेती केली तर फायदेशीर आणि शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा  संपन्न करणारी ठरणारी असल्याचे शिंदे यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.

  • अत्यंत कमी पाण्यात शिंदे यांनी नियोजन करून ठिबकचा वापर केला. त्याचबरोबर शेतात शेततलाव बांधला.
  • नऊ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनद्वारे विहिरीतून पाणीही आणले. त्यामुळे दुष्काळातही बाग टिकून राहिली.
  • द्राक्षाबरोबरच आता तीन एकरात उंबरान नावाने बोर आणि एका एकरात केशर आंबा लावून ठिबकवर याही फळांना वाढवले आहे.
  • द्राक्षाच्या एका झाडाला पंधरा ते वीस किलो माल मिळत असून वर्षांकाठी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न हातात पडल्याने आपणही आर्थिकदृष्टय़ा संपन्न होऊ शकतो हा वशिं्वास शिंदे यांनी सिद्ध केला.
  • शेतीची आवड, त्यात नवीन प्रयोगाची जिद्द यामुळे त्यांनी शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत कोरडवाहू शेतीला फळबाग शेती करून आर्थिक समृद्धीच साधली आहे.
    vasantmunde@yahoo.co.in

First Published on February 4, 2017 12:21 am

Web Title: grape farming in drought areas