17 December 2017

News Flash

‘हुरडा’ शेती फायद्याची!

हुरडा पार्टीसाठी खास गावकी बाज, सोबत रानमेवा, चुलीवर भाजलेल्या भाकरी अन् कालवनाचा बेत.

वसंत मुंडे | Updated: February 11, 2017 12:19 AM

पाटर्य़ामुळे हुरडय़ाला मागणी वाढल्याने मोठय़ा प्रमाणात आता शेतकरीही हुरडा पिकवू लागले आहेत. जनावरांसाठीही मोठय़ा प्रमाणात चारा उपलब्ध होत असल्याने हुरडा शेती कमी दिवसांत फायद्याची ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हुरडा शेतीची आर्थिक गोडी लागली आहे. एका एकरात साधारणपणे दोनशे किलो हुरडा तयार होतो.

हुरडा पार्टीसाठी खास गावकी बाज, सोबत रानमेवा, चुलीवर भाजलेल्या भाकरी अन् कालवनाचा बेत. तोही शेतात भारतीय बठकीत अगदी पोताडय़ावर ठाण मांडून! गोवऱ्याच्या भट्टीतून भाजून काढलेली कणसे हातावर चोळून काढलेल्या गरम हुरडय़ाची चव. सोबत दही आणि वेगवेगळ्या चटण्यांचा आस्वाद कोणाला नको असतो? नातेवाईकांपुरत्या मर्यादित असलेल्या या हुरडा पाटर्य़ाना आता व्यावसायिक स्वरूप आल्याने शहरातील लोकही मनसोक्त आनंद लुटू लागले आहेत. व्यावसायिक पाटर्य़ानी आता हुरडा शेतीचा अभिनव प्रयोग पुढे आला असून शेतकऱ्यांनाही अवघ्या नव्वद दिवसांत चांगले उत्पन्न आणि जनावरांसाठी मुबलक चारा मिळू लागल्याने हुरडा शेतीच्या अर्थनीतीला शहराभोवती उभ्या राहिलेल्या हुरडा पाटर्य़ानी बळकटी दिली आहे.

बीडसह सर्वत्रच ग्रामीण भागात रब्बीला खास हुरडा पिकवला जाई आणि नातेवाईक, मित्रांसाठी हुरडय़ाच्या पाटर्य़ा होत. मात्र बदलत्या वेगवान काळात शेतामधील हुरडय़ाच्या पाटर्य़ा कमी झाल्या आणि शहराभोवती व्यावसायिक स्वरूपात या पाटर्य़ानी मूळ धरले आहे. शहरीकरणामुळे माणसांना मोकळा श्वास आणि अस्सल चवदार रानमेवा आता हुरडा पाटर्य़ातून मिळू लागल्याने मागील काही वर्षांपासून शहरालगतच्या मुख्य रस्त्यांच्या बाजूला शेतांमध्ये पाटर्य़ाचे फड तयार झाले आहेत. गावाकडच्या झोपडय़ा, खास गावरान भोजन, बलगाडी, झोके, मुलांना खेळण्यासाठी साहित्य, जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अशा सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याने शहरातील नागरिकांनी या पाटर्य़ाना पसंती दिली. नोव्हेंबर महिन्यापासून हुरडा पाटर्य़ाना सुरुवात होते. आणि कोणी वाढदिवसासाठी तर सुट्टीला कुटुंबासह येऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेतात. प्रति व्यक्ती साडेतीनशे रुपये अशा माफक दरात हुरडा, रानमेवा आणि भोजनाचा आस्वाद मिळत असल्याने या पाटर्य़ासाठी गर्दी आहे.

हुरडय़ाची मागणी वाढल्याने आणि हुरडा शेतीला महत्त्व आल्याने काही गावांतून शेतकरी दरवर्षी केवळ हुरडा पिकवतात हे विशेष. दिवसेंदिवस आता शेतकरी हुरडा शेतीकडे वळू लागल्याने हुरडा पाटर्य़ानी हुरडा शेतीच्या अर्थकारणाला गती दिली आहे. एका एकरमध्ये तीन महिन्यांत साधारणपणे दोन क्विंटल हुरडा तयार होतो. प्रति क्विंटल शंभर ते दीडशे रुपयाने तो विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगली रक्कम मिळते. तर जनावरांसाठी चाराही मुबलक प्रमाणात मिळतो. गुळभेंडी जातीच्या हुरडय़ाला जास्त मागणी असल्याने व्यावसायिकांनी हुरडा पाटर्य़ामध्ये प्रति व्यक्ती साडेतीनशे रुपये दर ठेवला आहे.

सुरुवातीला रानमेवा, कवळा हरभरा, गाजर, मधुमक्का कणीस, रेवडी, गोडीशेव, पेरू त्यानंतर भट्टीच्या शेजारी बसून गरम गरम हुरडा खायला मिळतो. एक व्यक्ती अर्धा ते दीड किलोपर्यंत हुरडा खाते असे सांगितले जाते. हुरडय़ाबरोबर शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, तीळ चटणी आणि दही साखर, दही चटणी असेही पदार्थ असतात. त्यानंतर चुलीवर भाजलेल्या भाकरी आणि चुलीवरचेच पिठले किंवा वांग्याची भाजी. शिवाय दालबट्टीही मिळते. तर पार्टीत लहान-मोठय़ांच्या मनोरंजनासाठी बलगाडी, घोडा सफर आदी मनोरंजनाच्या सुविधाही दिल्या जात असल्याने सुट्टीच्या दिवशी असंख्य कुटुंबे पाटर्य़ामध्ये दिवस घालवतात. हुरडय़ाला मागणी वाढल्याने मोठय़ा प्रमाणात आता शेतकरीही हुरडा पिकवू लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील नरसापूर (ता. गंगापूर) या गावातून हुरडा मागवला जातो. किरण िशदे हे हुरडा उत्पादक मागील आठ वर्षांपासून दरवर्षी पाच एकरात हुरडा पिकवतात. एका एकरात साधारणपणे दोनशे किलो हुरडा तयार होतो. ती कणसे पाटर्य़ावाल्यांना विकली जातात. तर जनावरांसाठीही मोठय़ा प्रमाणात चारा उपलब्ध होत असल्याने हुरडा शेती कमी दिवसांत फायद्याची ठरत असल्याने शेतकऱ्यांना हुरडा शेतीची आर्थिक गोडी लागली आहे.

बीड शहरालगतच्या जालना रस्त्यावर वृंदावन हुरडा पार्टीचे प्रमुख अनिल तापडिया व अभिजीत सांबरे, केदार अंबुरे यांनी हुरडा पार्टी केंद्र सुरू केले. सुरुवातीला चार लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर एका एकरमध्ये झोपडय़ा आणि भट्टय़ा लावल्या. आतापर्यंत तीन महिन्यांत पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी हुरडय़ाचा आस्वाद घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हुरडा पाटर्य़ानी शहरातील नागरिकांना गावरान मेव्याचा आनंद मिळत असल्याने हुरडा शेतीला प्रोत्साहन मिळू लागल्याने अनेक शेतकरी हुरडा शेतीकडे वळू लागले आहेत.

vasantmunde@yahoo.co.in

First Published on February 11, 2017 12:19 am

Web Title: hurda party farming