News Flash

‘इफ्को किसान’कडून मोफत सेवा

‘इफ्को किसान’कडून शेतकऱ्यांसाठी इफ्को ग्रीनकार्ड उपलब्ध केले आहे.

‘इफ्को’ ही जगातील सर्वात मोठी तसेच सहकार क्षेत्रातील खत उत्पादक आणि वितरक संस्था असून या अग्रगण्य संस्थेची साहाय्यक कंपनी ‘इफ्को किसान’ ही इफको समूहाचाच भाग आहे. मोबाइलवर मोफत ध्वनिसंदेशातून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देऊन त्यांची आíथक उन्नती करणे हे या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

‘इफ्को किसान’कडून शेतकऱ्यांसाठी इफ्को ग्रीनकार्ड उपलब्ध केले आहे. त्यावर दररोज शेतकऱ्यांना मोफत तीन ध्वनिसंदेश दिले जातात. यातून शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान वेळेवर वितरित केले जाते. यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, उद्यानविद्या, बाजारभाव, शेतमालाचा वायदे बाजार, हवामान, हवामान आधारित कृषी सल्ला, आरोग्य, शिक्षण, सरकारी योजना व रोजगार यासंबंधी माहिती दिली जाते. यासोबतच एक हेल्पलाइन- ५३४३५१ आहे ज्यावर शेतकऱ्यांच्या कृषीविषयक प्रश्नांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. या सर्व सेवा देण्याकरिता विविध राज्यांमध्ये आणि भाषांमध्ये, २४ कृषीतज्ज्ञ आपल्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. ध्वनिसंदेश पुन्हा ऐकण्यासाठी ५३४३५ या क्रमांकाचा वापर करता येतो.

‘इफ्को किसान’चे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. रामचंद्र साबळे सरांकडून हवामान आधारित कृषी सल्ला व ज्येष्ठ पशुआहारतज्ज्ञ डॉ. बबन होळ या तज्ज्ञाशी थेट संवाद साधण्याकरिता ५३४३५१ हा क्रमांक ग्रीनकार्डवरून डायल करावा. प्रत्येक शेतकऱ्याकडे शेळ्या, गाई, बैल हे शेतीपयोगी प्राणी असतात. त्यामुळे वर्षभरातील विविध कालावधीत या जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार देता येईल यासाठी होळ यांच्याकडून उपयुक्त माहिती मिळविता येईल.  अधिक माहितीसाठी व इफ्को किसानचे ग्रीनकार्ड हवे असल्यास ८१३०३३३१११ या क्रमांकावरती ‘मिस्ड कॉल’ करावा.

इफ्को किसानची स्मार्टफोनधारक शेतकऱ्यांनाही मोबाइल अ‍ॅप्सवरून मोफत सेवा

स्मार्टफोन यूजर्सचे नॉलेज आणखी अपडेट करण्यासाठी आता आणखी एक खूशखबर. तुम्ही तुमचा स्मार्टफोन केवळ फेसबुक, ट्विटर आणि गेम्ससाठीच वापरता? असं असेल तर जरा त्यातून बाहेर या. कारण यापेक्षा आणखी काही उपयोगी अ‍ॅप्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या वापरामुळे तुमच्या मोबाइल वापराला एक नवी दिशा देऊ शकतो. इफ्को किसान हे अ‍ॅप खास शेतकरी तसेच शेतीमध्ये रुची असलेल्यांसाठी आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळवू शकतात. यासोबतच याच्या माध्यमातून ते शेतीतज्ज्ञांना प्रश्नही विचारू शकतात. तसेच यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, शेतकरी घरबसल्या विविध बाजारपेठेतील भाज्यांच्या दरांची माहिती मिळवू शकतात. इफ्को किसानचे मोबाइल अ‍ॅप हे शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आले आहे, या अ‍ॅपमध्ये भारतीय हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, आपल्या भागातील बाजार समितीतील शेतमालाचे बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला, कृषी सल्ला, ग्रंथालय संग्रह, ताज्या बातम्या, ई-बाजार, चॅटिंग, हेल्पलाइन आणि स्वत:चे प्रोफाइल यांचा समावेश केला आहे. या अ‍ॅपमध्ये दहा भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील विविध भागांत तीव्र दुष्काळ असताना पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत सरकारी पातळीवर निरुत्स आहे. त्यामुळे पाणीव्यवस्थापनाबाबत शेतकरी या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवू शकतील. शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्टय़ा प्रबळ बनविण्याचाच हा प्रयत्न आहे.

वरील सर्व उपयुक्त मोफत माहिती मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना आपल्या स्मार्ट मोबाइलमधील प्लेस्टोर (अ‍ॅण्ड्रॉइड) अथवा अ‍ॅप स्टोअर (अ‍ॅपल) मध्ये जाऊन इफ्को किसान (कााउड ङकरअठ) हे अ‍ॅप  घ्यावे लागेल. याद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनवरही या मोफत सेवांचा लाभ घ्यावा, तसेच इतर शेतकऱ्यांनाही फायदा घेण्यास सांगावे असे इफ्को किसानचे व्यवस्थापक अभिजित सोनावणे  यांनी सांगितले आहे.

इफ्को किसान मोबाइल अ‍ॅपमध्ये शेतकऱ्यांस उपयुक्त अशा खालील सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

  • हवामान – भारतीय हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, या भागात एकाच वेळी दोन ठिकाणांची निवड करता येते. तापमान, आद्र्रता, पावसाची शक्यता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा तेही निवडलेल्या जिल्ह्य़ानुसार उपलब्ध केली आहे. यामध्ये शेतकऱ्याला ज्या जिल्ह्याची माहिती हवी असेल त्या जिल्ह्य़ाची माहिती तो जिल्हा बदलवूनही मिळवू शकतो. या हवामानाच्या अंदाजावर शेतकरी शेतीसंबंधीच्या कामाचे नियोजन करू शकतात.
  • बाजार समिती – यामध्ये निवड केलेल्या कृषी बाजार समितीनुसार शेतमालाचे, जास्तीत जास्त व कमीत कमी दर प्रती िक्वटल या प्रमाणात उपलब्ध होतील, तसेच शेतमालाच्या वायदे बाजाराचीही माहिती मिळेल. पाच विविध शेतमालांची व कृषी बाजार समितीची निवड करून बाजारभाव व वायदे बाजाराची माहिती मिळवता येते. या माहितीआधारे शेतीमालाची विक्री आज करावी किंवा नंतर भविष्यात करावी याचा निर्णय आपण घेऊ शकता.
  • तज्ज्ञ – यामध्ये पीक, फळपीक, जनावराच्या फोटोसह लिखित स्वरूपात तज्ज्ञास प्रश्न करण्याचे प्रयोजन केले आहे. त्यावर त्वरित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलेला सल्ला पाहून अचूक उपाययोजना करता येईल.
  • सल्ला – यामध्ये इफ्को किसानचे मोफत ध्वनिसंदेश ऐकून व वाचून माहिती मिळविता येईल.
  • बाजार – यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांच्याकरिता एक व्यासपीठ आहे. जसे की शेतकरी आपल्या उत्पादित शेतमालाची विक्री आता किंवा भविष्यात करावयाची असल्यास शेतमालाचा तपशील पोस्ट करू शकतो. त्यानंतर अनेक खरेदीदार तो खरेदी करू शकतात.
  • बातम्या – यामध्ये दररोज नवनवीन ग्रामीण जनसमुदायास उपयुक्त अशा बातम्या वाचण्यास मिळतील.
  • प्रोफाइल – यामध्ये आपल्या फोटोसह व्यक्तिगत संपूर्ण माहिती भरून, त्या संदर्भाची माहिती प्राप्त करता येईल.

abhijit.iksl@issco.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 3:44 am

Web Title: iffco kisan helping farmers
टॅग : Farmers
Next Stories
1 परिश्रमाला रोपवाटिकेचे ‘फळ’
2 कृषीवार्ता : कृषी व्यापार व्यवस्थापन संस्था वाढविण्याचा केंद्राचा विचार
3 विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती
Just Now!
X