‘पी हळद अन् हो गोरी’ अशी एक म्हण आहे. मात्र, वरून गोरे होण्याबरोबरच आतूनही रोगमुक्त होण्यासाठी औषधांची गरज असते. सौंदर्य जोपासण्यासाठी आणि आहे ते तारुण्य चिरकाल अबाधित राहावे ही नसíगक इच्छा प्रत्येकाची असते. मात्र, ही इच्छा फलद्रूप होण्यासाठी शरीर चिरतरुण आणि महागडा औषधोपचार टाळण्यासाठी आयुर्वेदाने कोरफडीचा उपयोग नामी मानला आहे. शरीराअंतर्गत हालचालीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर आधुनिक जीवनशैलीशी निगडित उपचारपद्धती ही आजकालची फॅशन ठरू लागली आहे.

याच आधुनिक जगासाठी सांगली जिल्ह्यतील जतसारख्या दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याने शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून कोरफड लागवड केली. आज या कोरफडीपासून बाजारात नवनवीन उत्पादने बाजारात आणली असून याचा लाभ या दुष्काळी भागातील अन्य लोकांनाही होत आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
jitendra awhad marathi news, jitendra awhad latest news in marathi
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाजपची जादू संपलेली आहे”
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..

जत तालुक्यातील शेगावचे संभाजीराव बोराडे हे प्रयोगशील शेतकरी. तसा कायमचा दुष्काळाचा शिक्का असलेला हा प्रदेश. वार्षकि पर्जन्यमान ४५० मिलीपर्यंत. जमीन मात्र ऐन पावसात रानातून चप्पल घालून फिरले तरी चप्पलला चिखल लागणार नाही अशी निचऱ्याची. याच शेतीत नवा प्रयोग करायचा ही जिद्द धरून वेगळे पीक घ्यायची तयारी बोराडे यांनी केली.

जगात कोरफडीच्या ३०० जाती आहेत. यापकी ४ जातींमध्येच औषधी गुणधर्म आढळतात. राहुरी कृषी विद्यापीठाने यापकी काही जाती विकसित केल्या आहेत. यांपकी ‘बारबोडिस मिलर’ या जातीच्या रोपांची लावणी सात एकर जमिनीत सात वर्षांपूर्वी केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथा पाणथळ जमिनीत याची लावण केली तर मुळे कुजून रोपांचे नुकसान तर होतेच, कोरफडही जळून जाते.

एका रोपाला हलक्या जमिनीत दर आठ दिवसांनी, मध्यम जमिनीत दहा १० तर भारी जमिनीसाठी १५ दिवसांनी दोन ते तीन लिटर पाणी पुरेसे ठरते. महत्त्वाचे म्हणजे, पावसाने दगा दिला अथवा पाण्याची सुविधा जर या वेळेत उपलब्ध झाली नाही तर रोप वाळण्याची अजिबात भीती नाही. वाळवंटातील उंटाप्रमाणे कोरफडीची पाने हवेतील ऑक्सिजन आणि हायड्रोजन ग्रहण करून तेच पाणी मुळापर्यंत पोहचवून आपली गरज भागवतात. ज्या वेळी पाणी उपलब्ध होईल त्या वेळी पुन्हा जिवंत होतात. यामुळे पाण्याचे दुíभक्ष असलेल्या भागातही या पिकाला धोका नाही. तसेच या पिकावर कोणताही रोग येत नाही यामुळे बदलत्या  नसíगक परिस्थितीशी सामना करणे कोरफडीला सहजशक्य ठरते.

कोरफडीची लागवड केल्यानंतर दीड ते दोन वर्षांनी पानामध्ये औषधी गुणधर्म उतरतात. यानंतर या अर्धा ते एक किलो वजनाची पाने काढून वेगळी केली जातात. पानाची स्वच्छता करून यापासून गर बाजूला काढला जातो. या गरामध्ये औषधी गुणधर्म आहेत की नाही याची तपासणी पुणे, हैदराबाद, कोईम्बतूर येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. मगच या गराची विक्री विविध औषधी कंपन्यांना केली जाते. सर्वसाधारण औषधी गुणधर्म कसे आणि किती प्रमाणात आहेत यावर या गराचा दर मिळतो. सर्वसाधारण तीन ते आठ रुपये किलो या दराने औषध कंपन्या या गराची खरेदी करतात. एकरी वार्षकि उत्पादन ३० ते ११० टनांपर्यंत मिळू शकते.

या पिकासाठी सिंचनव्यवस्था पाटपाणी, ठिबक याद्वारे करण्यात आली असून दर आठवडय़ाला पाणी दिले जाते. याचे प्रमाणही कमी असल्याने उपलब्ध पाण्यात सात एकर कोरफड शक्य ठरली आहे. आंतरमशागत करता येत नसल्याने भांगलन आणि सेंद्रिय खत, शेणखत याचाच प्रामुख्याने वापर केला तरच कोरफडीपासून औषधी गुणधर्म चांगल्या पद्धतीने मिळतात.

कोरफडीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनासाठी केला जात असला तरी यामध्ये असलेल्या अन्य औषधी गुणधर्माची माहिती सामान्यांना असत नाही. शरीराला लागणारी वेगवेगळी आम्ले, खनिजे याची मात्रा कोरफडीमध्ये असते. यामध्ये २०० प्रकाराचे घटक असतात. यापकी ७५ घटक हे मानवी शरीराला पोषक ठरतात. २२ प्रकाराची विविध आम्ले, २० हून अधिक लोह, फॉस्फरस, नत्र सारखी खनिजे यांचा समावेश आहे.

या औषधी गुणधर्मामुळे कोरफडीपासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थाच्या नित्य सेवनाने शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण १२५हून कमी झाले तर वाढविण्याचे आणि अतिरिक्त साखर झाली तर कमी करण्याचे काम होते. तसेच उंचीनुसार आवश्यक तेवढेच वजन ठेवण्याचे कामही केले जाते. याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थाबरोबरच मृत पेशी बाहेर काढून नवीन पेशीनिर्मितीचे कामही केले जाते.

बोराडे यांनी या पदार्थापासून सुशांत अ‍ॅग्रोमार्फत संजीवनी नावाचे उत्पादनही बाजारात आणले असून या उत्पादनाला राज्यभरातून मागणीही आहे. विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या ७० कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातूनही कोरफडीचा औषधी गुणधर्म लोकांना पटवून देण्याचे काम केले जाते. तसेच विविध भागांत कोरफडीपासून तयार केलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी काही तरुणही नियुक्त केले असून त्यांनाही अर्थार्जन या माध्यमातून होत आहे. आणखी काही होतकरू तरुण विक्री आणि विपणन करण्यासाठी आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळी भागात राहून केवळ उत्पादनच करीत बसण्यापेक्षा उत्पादित होणारा शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत आणि किफायतशीर दरात देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे बोराडे यांनी सांगितले. शेतीत माल उत्पादित केला तर त्याचे बाजारात विक्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातच उत्पादन करणारा शेतकरी बाजाराचे तंत्र अवगत नसल्याने नुकसानीत येतो. मग उत्पादित खर्चाशी दर मिळत नसल्याची रास्त तक्रार करीत असतो.

बोराडे यांनी केवळ कोरफडीपासूनच औषधनिर्मितीवर न थांबता, वेगवेगळ्या सेंद्रिय शेतीमालावर प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सौंदर्य प्रसाधनासाठी वापरता येणाऱ्या जेलपासून टूथपेस्टपर्यंतची निर्मिती सुरू केली आहे. टूथपेस्टमध्ये कढिलिंबाचा वापर केला जात आहे. तसेच आवळा, कारले, जांभूळ, लिंब, सरडा, तेरडा, कोकम, डाळिंब, अर्जुन, लिंबू, आले याचे रस आणि पावडर तयार केली जात आहे. याच्या विक्रीसाठीची यंत्रणाही उभी करण्यात येत असून यासाठी तरुण मुलांचीही रोजगाराची गरज काही प्रमाणात पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

काही द्राक्ष व डाळब बागांमध्ये वजन आणि गुणवत्ता वाढीसाठी कोरफडीच्या रसाचा सध्या वापर करण्यात येत असल्याने हा नवीन ग्राहकही मिळत आहे. तसेच कोकणातून ऐन पावसाळ्यात येणारे मेंढपाळही रोग नियंत्रणासाठी कोरफडीची पाने मुद्दाम मेंढय़ांना चारत असल्याचे बोराडे यांनी सांगितले.

अशी ही बहुगुणी कोरफड शेती दुष्काळी भागासाठी वरदान असली तरी बरेच शेतकरी भीतीपोटी याची लागवड करण्यास धजावत नाहीत. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रोपांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या रसाची प्रयोगशाळेत तपासणी करूनच हा प्रयोग करणे गरजेचे आहे. अन्यथा ३०० पकी २९६ जाती या निरुपयोगी असतात असेही त्यांनी सांगितले. या आगळ्यावेगळ्या कृषी उपक्रमाबद्दल बोराडे यांचा राज्य शासनाने २०१२-१३ मध्ये सेंद्रिय कृषी पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे.

दिगंबर शिंदे

digambarshinde64@gmail.com