01 March 2021

News Flash

कृषीवार्ता : यंदा शेतकऱ्यांचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढणार

मान्सूनमुळे शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रातील २० टक्के उत्पन्न वाढणार

  • ‘जेएम फायनान्शिअल’ या संस्थेने सव्‍‌र्हेक्षण करून नुकत्याच मांडलेल्या अहवालात यंदा मान्सून साधरण झाला तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • मान्सूनमुळे शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रातील २० टक्के उत्पन्न वाढणार असून ग्रामीण भागातील उत्पन्न १२ टक्क्यांनी वाढण्यास मदत होणार आहे.
  • २०१४-१५ या वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न ३ टक्क्यांनी तर २०१५-१६ या वर्षांत ४ टक्क्यांनी कमी झाले. २०१४ आणि २०१५ या वर्षांत मान्सूनचे प्रमाण अनुक्रमे १२ आणि १४ टक्क्यांनी कमी झाले होते.
  • हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा २०१४-१५ मध्ये २२ टक्क्यांनी तर २०१५-१६ मध्ये १८ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

  • राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत पाऊस झाला.
  • या पावसामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण त्याचबरोबर काही भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या.
  • जळगावमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र, त्यामुळे विविध भागांतील वीजपुरवठा खंडीत झाला.
  • मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:47 am

Web Title: loksatta farming news 4
Next Stories
1 कोरडवाहू शेतीत पाणी मुरवण्याचे नवे तंत्र
2 ‘इफ्को किसान’कडून मोफत सेवा
3 परिश्रमाला रोपवाटिकेचे ‘फळ’
Just Now!
X