• गतवर्षी ‘व्हाइटफ्लाय’ किटकांच्या प्रादुर्भावामुळे पंजाब आणि हरयानातील २७ टक्के म्हणजे ७.५६ लाख हेक्टर कापूस शेतीक्षेत्रात घट झाली आहे. किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादना घेण्याऐवजी इतर पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले.
  • २०१५-१६ या वर्षांत या दोन्ही राज्यांत १०.३ लाख हेक्टर जमिनीवर कापूस लागवड करण्यात आली होती.
  • ‘व्हाइटफ्लाय’ किटकांच्या प्रादुर्भावामुळे या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागले, अशी माहिती कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
  • या किटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १५ मेपूर्वी पेरण्या पूर्ण करण्याचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला होता.

दुष्काळग्रस्त व थकबाकीदार शेतकऱ्यांना मोफत बियाणे

  • यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्त असूनही सरकारकडून कोणतेच साहाय्य न मिळालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. – ‘इंडियन र्मचटस चेंबर’ या संस्थेने यासाठी सरकारशी सहकार्याचा हात पुढे केला असून मोफत बियाणे वाटपासंबंधीचा करारही सरकारसोबत केला आहे.
  • या संबंधीच्या सामंजस्य करारावर सरकार आणि ‘इंडियन र्मचटस चेंबर’च्या प्रतिनिधींनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या.
  • सन २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत पीक कर्जे घेतलेले जे शेतकरी आजपर्यंत कर्जफेड करू शकलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून मोफत बियाणे देण्यात येईल.