पश्चिम बंगालमध्ये ‘मनरेगा’ अंतर्गत फलोत्पादन विकास

  • पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम विकास रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) फलोत्पादन विकास केला आहे.
  • ‘मनरेगा’चा लाभ घेत नादिया जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी जरबेरा, ढोबळी मिरची तसेच ‘पॉली हाऊस’द्वारे फलोत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘पॉली हाऊस’ बांधण्याकरीता साहाय्य केले जाते.
  • ‘पॉली हाऊस’मुळे शेतsकऱ्यांना बिगरमोसमी शेती करतानाही मदत होत असून नर्सरी उत्पादने घेणेही सोपे होत आहे. तसेच उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना साहाय्य करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात ८८ टक्के पेरण्या पूर्ण

  • जूनअखेपर्यंत मान्सून संपूर्ण देशात कार्यान्वित झाल्याने पेरण्याना वेग आला असून ८८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भात आणि डाळीच्या उत्पादनाच्या दृष्टीने पेरण्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.
  • कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणा यांसह अन्य काही राज्यांमध्ये डाळींच्या उत्पादनाच्या दृष्टीने लागवडीवर भर देण्यात आला आहे.
  • तामिळनाडू या राज्यांमध्ये भात लागवडीच्या पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. महाराष्ट्रातही काही पारंपरिक पिकांची लागवड करण्यात आली आहे.