News Flash

मानवनिर्मित दुष्काळ बदलायला शिकवतोय

महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. १८७१ सालापासून राज्यात २३ वेळा दुष्काळ पडले.

महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. १८७१ सालापासून राज्यात २३ वेळा दुष्काळ पडला. गेल्या ५० वर्षांत १९७२ व १९८७ चे दुष्काळ भीषण होते. खरं तर बदलत्या हवामानाचा विचार केला तर आत्ताच्या दुष्काळाला आपत्ती समजण्यापेक्षा योग्य व्यवस्थापनाचा कालखंड म्हटले तर बरे होईल. कारण राज्यात दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. त्यामुळे दुष्काळावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्या परिणामाचा विचार करून योग्य पद्धतीने व्यवस्थापन या विषयावर अधिक भर द्यायला हवा.

महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. १८७१ सालापासून राज्यात २३ वेळा दुष्काळ पडले. गेल्या ५० वर्षांत १९७२ व १९८७ चे दुष्काळ भीषण होते. मागील ४ वर्षांपासून दुष्काळाला सामोर जावे लागत आहे. १९७२ च्या दुष्काळात अन्नधान्य व रोजगाराचा प्रश्न गंभीर होता. तर १९८७ चा दुष्काळ जनावरांचा चारा व छावण्यांमुळे चच्रेत आला. गेल्या ५ वर्षांत शेती व्यवस्थापन, उत्पादन, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या, फळबागा या विषयांवर मोठी चर्चा झाली. खरं तर बदलत्या हवामानाचा विचार केला तर आत्ताच्या दुष्काळाला आपत्ती समजण्यापेक्षा योग्य व्यवस्थापनाचा कालखंड म्हटले तर बरे होईल. कारण राज्यात दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाटीलाच पुजलेला आहे. त्यामुळे दुष्काळावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्या परिणामाचा विचार करून योग्य पद्धतीने व्यवस्थापन या विषयावर अधिक भर द्यायला हवा.

दुष्काळामुळे शेती उत्पादनात घट येते, पीक वाया जाते, नापिकीचा प्रश्न निर्माण होतो. पण राज्यात फळबागांखालील क्षेत्र वाढले आहे. त्या फळबागाच धोक्यात येतात. अनेक शेतकरी टँकरने पाणी घालून बागा वाचविण्याचा प्रयत्न करतात. शेतीला पशुधनाचा जोडधंदा आहे. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात फळबागा वाचविणे, जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करणे, लोकांना रोजगार या बाबीच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याचे गरज आहे. निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरण बदल होऊन नसíगक आपत्ती निर्माण झाली. त्यासाठी निसर्गाकडून जे आपण घेतो त्या बदल्यात काय देतो याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे सूर्य, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या पंचमहाभूतांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले नाही तर आपत्ती आणखी वाढेल. दुष्काळामुळे निसर्ग काही शिकवतो व काही सांगतो. त्या शिकवणुकीचा वापर कृतीत केला तर समस्यांवर मात करणे सोपे होईल.

दुष्काळ म्हणजे पाण्याचा गंभीर प्रश्न होय. मग पाणी फक्त मागील ५ वर्षांतच कमी झाले का? आपल्या देशात १९५१ मध्ये दरडोई ३४५० चौरस मीटर पाण्याची उपलब्धी होती. १९९९ मध्ये ते प्रमाण १२५० चौरस मीटपर्यंत कमी झाले. २०३० पर्यंत दरडोई पाणी ७६० चौरस मीटरवर जाईल. प्रत्येकाला आज १७०० चौरस मीटर पाण्याची गरज आहे. भविष्यात त्याच्या निम्मेही पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच पाणी वापराबाबत जनजागृत झाले पाहिजे. पाणी अतिशय मौल्यवान आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी प्रत्येकानेच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. पाण्याबरोबर जमिनीचे व्यवस्थापन करून दुष्काळाचा दाह कमी करता येणे शक्य आहे. हल्ली शेतकरी शेतीसाठी धरणे, कालवे, विहिरी, कूपनलिका यांवर अधिक अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांपासून त्याने शेततळ्याचा प्रभावी मार्ग अवलंबिला आहे. शेततळ्याने शेतकरी समृद्ध झाला, पण त्याचबरोबर त्याची दुसरी बाजू विचारात घ्यायला हवी. शेततळ्यात ३०० ते ४०० फुटावरचे पाणी उचलून ते तळ्यात साठविले जाते. त्याने पाण्याची पातळी खोल जाऊन जमिनीचे तापमान मोठय़ा प्रमाणात वाढते. तळ्यात साठविलेल्या पाण्याचे सूर्यप्रकाशामुळे २५ ते ३० टक्के बाष्पीभवन होते. शुद्ध पाणी बाष्पीभवनामुळे जाऊन खारवट पाणी पिकाला राहते. पण आता हे बाष्पीभवन थांबविण्यासाठी इव्हालॉक पदार्थाचा वापर केला तर पाण्याचा होणारा ऱ्हास टाळता येणे सहज शक्य आहे. फळबागा व ऊसपिकाला सूक्ष्मसिंचन पद्धतीची सक्ती करणे अनिवार्य आहे. तसेच जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी वॉटर अ‍ॅबसॉरबंटसारख्या पॉलीमर तंत्राबरोबरच सेंद्रिय पदार्थाचा जादा वापर, सेंद्रिय स्लरी व आच्छादन या पारंपरिक तंत्राकडे पुन्हा वळावे लागेल. शेण, जनावरांची विष्ठा ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे. ते शेतीचे खरे खाद्य आहे. म्हणून पिकांचे अवशेष, काडीकचरा पेटून देणे हा त्यादृष्टीने गुन्हाच मानायला हवा. असे धोरण राबविले तर जमिनीला खाद्य मिळेल. जमिनीची जलधारण क्षमता वाढून तिचे तापमान चांगले राहील. जमिनीतीच गांडुळ व जिवाणूंची संख्या वाढून प्रतिकूल परिस्थितीतही पिकांचे उत्पादन मिळेल. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. त्यामुळे खत म्हणून सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविण्यावर भर द्यावा लागेल. सध्याच्या काळात शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके याचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे रसायनांमुळे पिकांच्या शरीरप्रक्रियेत अनसíगक बदल होतात. पीक बदलत्या वातावरणात तग धरण्यास सक्षम राहत नाही. जैविक कीटकनाशके, वनस्पतीजन्य कीटकनाशके, लंगिक सापळे या नसíगक पीक संरक्षण संसाधनाचा वापर केला तर पिकांची प्रतिकार क्षमता वाढून नसíगक संकटाला पीक सक्षमपणे सामोरे जाते. फळबागा वाचवित असताना त्याचा गंभीरपणे विचार करावा, कारण फळबागा जळाल्या तर शेतकरी ५ वष्रे मागे जातो.

म्हणून शेतकऱ्यांनी एका पिकांवर अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीची शेती केल्यास त्यांना दुष्काळातही शेतीतील उत्पन्नाची चिंता करावी लागत नाही. त्याकरिता शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी तंत्रज्ञान देणाऱ्या संस्था तसेच माध्यमांबरोबर मत्री करणे आवश्यक आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हा दुष्काळावरील प्रभावी उपाय निश्चितपणे ठरू शकेल. दुष्काळ पडला म्हणून कोणीतरी येऊन आपले अश्रू पुसेल असा विचार शेतकऱ्यांनी सोडावा. रडत बसण्यापेक्षा लढत देण्याची मानसिकता ठेवली तर दुष्काळ, नसíगक आपत्ती तसेच कोणत्याही हानीकारक परिस्थितीवर सहज मात करता येईल.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय हा जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. प्रत्येक दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. वाढलेल्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गोठय़ात बांधलेल्या गाई दुष्काळ व उन्हामुळे अतिरिक्त ताण पडून आजारी पडतात. सरासरी दूध उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट होते. त्यांच्या प्रजनन क्रियेवर परिणाम होतो. पुढील ५ ते १० वर्ष याचे परिणाम भोगावे लागतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे दुष्काळाचा विचार करता सर्व बाबींचे नियोजन व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. मुक्त संचार पद्धतीने (मुक्त गोठा) दुष्परिणाम कमी करता येतात. मुरघास, हायड्रोपोनिक्स पद्धतीने हिरवा चारा निर्मिती व अझोलाचा वापर करून जनावरांना नसíगक प्रथिनांची उपलब्धतता केल्यास चाऱ्याचा प्रश्न सुटतो व उत्पादन खर्चात बचत होते. तसेच, जनावरांचे आरोग्य सांभाळणेही शक्य होते. खनिज मिश्रणांचा, प्रतिजैविकांचा वापर करून जनावरांवर दुष्काळ आणि उन्हामुळे होणारे अनिष्ट परिणाम कमी करता येतात. शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, पॉलीहाऊस व शेडनेट हाऊसद्वारे सरंक्षित शेती केल्यास रोजगार निर्मिती होते.

डॉ. भास्कर गायकवाड

लेखक कृषी विज्ञान केंद्र , बाभळेश्वर, ता. राहाता, जि. अहमदनगर येथे प्रमुख शास्त्रज्ञ  आहेत.

kvkahmednagar@.gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:34 am

Web Title: manmaid drought issue in maharashtra
टॅग : Maharashtra
Next Stories
1 आंबा निर्यातवाढीसाठी ‘पणन’ने कंबर कसली
2 कृषीवार्ता : केंद्राकडून ८ हजार ५०० टन डाळींची निर्यात
3 इरादे तर चांगले, पण..
Just Now!
X