सांजा येथील अजहर शेख हा सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नसताना वडिलोपार्जति शेतीव्यवसायातच वेगळे काही करण्याची जिद्द मनात ठेवून शेतीकडे वळला. शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगाची माहिती घेत असतानाच झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत असलेली मागणी आणि त्या तुलनेत जिल्ह्य़ातील झेंडूचे क्षेत्र याचा त्याने अभ्यास केला. आणि झेंडू फुलाची शेती करण्याचा निर्णय या तरुण शेतकऱ्याने घेतला.

Nagpur, Surge in Road Accidents, 102 Dead 284 Injured, Nagpur accidents, nagpur surge accidents, accidents news, nagpur news, marathi news, traffic police, rto, accident in nagpur, nagpur accident,
नागपूर : तीन महिन्यांत रस्ते अपघातात १०२ जणांचा मृत्यू , शहरात ३११ अपघात…
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
uran city residents facing water shortage
उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट; दोन्ही धरणांनी तळ गाठला
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी

सततचा दुष्काळ, नापिकीच्या चक्रात अडकलेला शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोटय़ात जात असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यात जमिनीची प्रत दुय्यम असेल तर विचारायलाच नको. मात्र उस्मानाबाद तालुक्यातील माळरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांजा शिवारातील मध्यम व चुनखडीव्याप्त जमीन आणि पाणीटंचाईने येथील शेती ओसाड पडत चालली असतानाच येथील अजहर रमजान शेख या युवक शेतकऱ्याने अवघ्या दोन एकर क्षेत्रावर झेंडू फुलाची शेती केली. हीच शेती शेख कुटुंबीयाचा मोठा आधार बनली आहे.

सांजा येथील अजहर शेख हा सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नसताना वडिलोपार्जति शेतीव्यवसायातच वेगळे काही करण्याची जिद्द मनात ठेवून शेतीकडे वळला. शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगाची माहिती घेत असतानाच झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत असलेली मागणी आणि त्या तुलनेत जिल्ह्य़ातील झेंडूचे क्षेत्र याचा त्याने अभ्यास केला. आणि झेंडू फुलाची शेती करण्याचा निर्णय या तरुण शेतकऱ्याने घेतला. अवघ्या दोन एकर क्षेत्रांत तत्काळ झेंडूच्या रोपांची लागवड केली. अवघ्या तीन महिन्यांत झेंडूची शेती बहरून आली. तीन महिन्यांतच अजहर याने सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे. आगामी दोन महिन्यांत निसर्गाची साथ मिळाल्यास आणखीन दोन लाखाचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे अजहर शेख या तरुणाने सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांचा ऊस आणि द्राक्ष बागेकडे कल असताना सांजा शिवारातील ही झेंडू फुलांची शेती पाहून अनेक जण झेंडू लागवडीकडे वळू लागले आहेत. यातच अजहर याच्या शेतीच्या यशाचे गमक दिसून येत आहे. अजहर शेख या तरुण शेतकऱ्याचा हा उपक्रम अन्य युवकासाठी अनुकरणीय असाच आहे. सांजा गाव आणि शिवार माळरानावरच वसलेले आहे. त्यामुळे येथील शेती व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे बोअरला पाणी लागेल याचीही शाश्वती देता येत नाही. अशाही बिकट परिस्थितीत अजहर व त्यांच्या कुटुंबीयाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत, पसे उसनवारी घेऊन पाण्याची सोय करून दोन एकर क्षेत्रावर गोल्डस्पॉट या देखण्या झेंडू फुलांची शेती बहरवली आहे. त्यामुळे शेख कुटुंबाला भरघोस आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना आणि कसा लाभ मिळतो, हे न उलगडलेले कोडे आहे. मात्र शेख कुटुंबीयाने शासनाच्या कोणत्याही योजनेवर विसंबून न राहता अथवा कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या न चढता झेंडू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीचा निवडलेला पर्याय सांजासह परिसरातील शेतकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

झेंडू शेतीच्या लागवडीपासून उत्पादनावर होणारा खर्च कमीतकमी व्हावा यासाठी त्याने शेतातील मशागतीची सर्व कामे तसेच फुलांची देखभाल ही कामे मजुरांकडून न करता त्यासाठी कुटुंबातील मंडळींमार्फत सर्व कामे केली. पाण्याचे योग्य नियोजन व खर्चात काटकसर करीत दोन एकरावर झेंडूचे नंदनवन बहरले आहे. शेतीत उत्पादित झालेली फुले त्यांनी हैदराबाद, पुणे मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येतात. सध्या फुलांची मागणी मंदावली असली तरी या बाजारपेठेत चांगला दर मिळाला. लग्नसराईची सध्या लगबग सुरू झाल्याने सध्या त्यांच्याकडील पिवळ्या व भगव्या रंगाच्या झेंडू फुलांना बाजारापेठेत चांगली मागणी असून दरही चांगला मिळू लागला आहे. आता अजहरची ही फूलशेती पाहून काही युवक या फुलशेतीकडे वळले असून, ही फूलशेती त्यांच्यासाठी मोठा आधार बनली आहे.

सण, उत्सव, समारंभ असो अथवा अन्य कोणताही कार्यक्रम. हार, गुच्छ, सजावटीसाठी फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यासाठी फुलांच्या बाजारपेठेत बारा महिने मोठी उलाढाल असले. विशेषत: दसरा, दिवाळी, पाडवा अशा मोठय़ा सणांबरोबर लग्नसराईच्या दिवसात फुलांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे फुलांच्या बाजारपेठेत कमी-जास्त प्रमाणात मागणी असतेच. अनेकदा फुलांची मागणी प्रचंड असली तरी त्या तुलनेत फुले उपलब्ध होत नाहीत. तर चांगल्या दर्जाची फुले हवी असल्यास ती व्यापाऱ्यांनादेखील सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेतील या मागणीचा विचार करता

फुलांची शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडू शकणारी आहे. मात्र त्यासाठी चिकाटी, जिद्द, मेहनत आणि काटकसरीचे नियोजन, बाजारपेठेची जाण, कोणत्या बाजारपेठेत उत्पादनाला योग्य दर मिळेल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. फुलांची शेतीदेखील ऊस, द्राक्ष अथवा अन्य नगदी फळबागांच्या तुलनेत भरघोस उत्पन्न देऊ शकते. याचेच उदाहरण अजहर शेख या तरुणाने अन्य शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यामुळे सांजा शिवारातील शेख कुटुंबीयांच्या या शेतीला परिसरातील शेतकरी आवर्जून भेटी देत आहेत.

योग्य नियोजनाची गरज

आमच्या कुटुंबीयांनी यापूर्वी घेवडा, काकडी, कांद्याची लागवड केली. त्यातूनही भरघोस उत्पन्न मिळाले. मात्र नवनवीन प्रयोगाची आवड असल्यास योग्य नियोजन, मेहनतीच्या बळावर तसेच बाजारपेठेचा अभ्यास करून शेती केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते. हे झेंडू फुलाच्या शेतीतून सिद्ध झाले आहे.

अजहर शेख, युवक शेतकरी

ravindra.keskar@rediffmail.com