आधुनिक पद्धतीने रोपांचे संगोपन करण्याबरोबरच आपल्या शेतात काहीतरी अभिनव प्रयोग करण्यासाठी बंडू घाटूळ यांनी फूलशेतीचा मार्ग निवडला. काही प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आणि गेल्या वर्षी झेंडू फूलझाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला एका एकरात त्यांनी झेंडू लावला. यातून त्यांना चार लाखांचा नफा मिळाला.

बहुतांशी शेतकरी दसरा, दिवाळी सणांचा विचार करून झेंडूचे पीक घेतात. बाजारात आवक वाढली, की भाव कोसळतो आणि रस्त्याच्या कडेला अनेक उत्पादकांना कवडीमोल भावाने द्यावे लागतात. शेवटी तर फुलांचे ढीग सोडून जावे लागते. अशा परिस्थितीत काठोडा येथील बंडू घाटूळ यांनी मात्र झेंडूची शेती बारमाही पीक म्हणून करण्याचा विचार केला. हैदराबाद, कल्याण, दादर यांसह मोठय़ा शहरांमध्ये झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असल्याने सुरुवातीला एका एकरात व नंतर दोन एकरांत झेंडूचे पीक सुरू केले. पहिल्याच वर्षी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने घाटुळांना आíथक सुगंधाची गोडी लागली. त्यातून परिसरातील शेतकरीही झेंडूच्या फूलशेतीकडे आकर्षति झाले असून, आता गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी झेंडूची शेती फुलवू लागले आहेत.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

बीड जिल्ह्यतल्या काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू घाटूळ यांनी आधुनिक प्रयोगांनी शेती समृद्ध केली. या परिसरात पारंपरिकतेतच शेतकरी रममाण आहेत. वेगळे प्रयोग करण्यास कोणी धजत नाही. काठोडय़ाचे बंडू घाटूळ हे दहा वर्षांपासून कंठकेश्वर हायटेक नावाने नर्सरीचा व्यवसाय करतात. आधुनिक पद्धतीने रोपांचे संगोपन करण्याबरोबरच आपल्या शेतात काहीतरी अभिनव प्रयोग करण्यासाठी बंडू घाटूळ यांनी फूलशेतीचा मार्ग निवडला. काही प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आणि गेल्या वर्षी झेंडू फूलझाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला एका एकरात त्यांनी झेंडू लावला. यातून त्यांना चार लाखांचा नफा मिळाला. मग त्यांनी झेंडूशेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

नोव्हेंबर महिन्यात दोन एकरांत झेंडू लावण्याचा निर्णय घेतला. िवडोस गोल्ड या वाणाची त्यांनी निवड केली. शेतात बेड प्रणाली वापरत, मिल्चग पेपर अंथरून १९ हजार ८७५ रोपांची त्यांनी लागवड केली. झेंडूसाठी तार, बांबू आणि रोपांचा खर्च जवळपास ४२ हजार रुपये इतका आला. ही लागवड बंडू यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये केली होती. आता झेंडूची गुबगुबीत फुले झाडांना लगडली आहेत. आठ ते दहा दिवसांना फुलांची तोड होते.

परिसरातील शेतकरी गटशेतीमार्फत झेंडूची लागवड करू लागल्याने उत्पादनखर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळत असल्याचे घाटूळ यांनी सांगितले. झेंडू हे पीक बारमाही घेण्याचा संकल्प बंडू यांच्यासह गटातील शेतकऱ्यांनी घेतल्याने फूलशेतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन परिसरात निर्माण झाला आहे. फक्त दसरा, दिवाळीच्या निमित्ताने झेंडू लागवडीकडे पाहिले जायचे. परिणामी, उत्पादन वाढायचे आणि मागणी कमी व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात फुलांची विक्री करावी लागे. शेवटी फुले रस्त्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नव्हता. परंतु आता बारमाही शेती केल्याने झेंडूने भरघोस उत्पन्न दिल्याच्या भावना घाटूळ यांनी व्यक्त केल्या. शिवाय इतर शेतकरीही सणोत्सव न पाहता बारमाही झेंडू शेतीकडे वळू लागल्याचे त्यांनी सांगितले. झेंडूच्या फुलांना बारमाही मागणी असल्यामुळे शेतकऱ्याला ही शेती आर्थिकदृष्टय़ा मोठय़ा प्रमाणावर लाभदायक ठरते आणि शेतीचा खर्च निघून पैसे उरतात, असेही यावेळी घाटूळ यांनी सांगितले.

पारंपरिक शेतीला छेद..

हैदराबाद येथील बाजारात झेंडूला ४० ते ५० रुपये तर कल्याण, दादर येथील बाजारात ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे फुलांना भाव मिळत आहे. यातून बंडू घाटूळ यांना दहा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. पारंपरिक शेतीला छेद देऊन घाटूळ यांनी आधुनिक फूलशेती केल्याने अनेक शेतकरीही या फूलशेतीकडे वळले आहेत.

वसंत मुंडे  vasantmunde@yahoo.co.in