News Flash

औषधी ‘पोमेलो’ची शेती!

बीड तालुक्यातील शिवणी या तीन हजार लोकसंख्येच्या गावातील बहुतांशी शेती पारंपरिक.

बीड तालुक्यातील शिवणी या गावातील सखाराम शिंदे यांनी शेतात केलेली पोमेलो फळांच्या झाडांची लागवड.

 

बीड तालुक्यातील शिवणी या गावातील सखाराम शिंदे यांनी आपल्या शेतात पोमेलोया फळाच्या रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आजारांवर गुणकारी असल्याने शहरांमध्ये या फळाला बाराशे रुपये डझन भाव असून चार वर्षांनंतर एका झाडाला वर्षभरात तीनशे फळ मिळतात. शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांना या वर्षी फळे आली असून त्यांना दोन बहरात यंदा जवळपास एक हजार फळे मिळणार आहेत.

उत्तर भारतात चाकोन्ना, कोकणात पोपनस आणि इंग्रजीत पोमेलो अशी नावे असलेले विविध आजारांवर गुणकारी मानले जात असल्याने या फळाला मोठय़ा शहरांमध्ये बाराशे रुपये डझन भाव असून चार वर्षांनंतर एका झाडाला वर्षभरात तीनशे फळ मिळतात. अशा औषधी फळांच्या शेतीचा प्रयोग शिवणीच्या सखाराम शिंदे यांनी केला आहे. चार वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांना या वर्षी फळे आली असून त्यांना दोन बहरात यंदा जवळपास एक हजार फळे मिळणार आहेत. बाजारातील मागणी लक्षात घेऊन शिंदे यांनी या वर्षी आता दोन एकरमध्ये पोमेलोच्या रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी पाण्यावर िलबूवर्गीय या औषधी फळाची शेती शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा त्यांचा आहे.

बीड तालुक्यातील शिवणी या तीन हजार लोकसंख्येच्या गावातील बहुतांशी शेती पारंपरिक. सातशे हेक्टरचे क्षेत्र वहितीखाली असले तरी ज्वारी, गहू, बाजरी, मका याच पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र सखाराम शिंदे यांनी सुरुवातीला इतरांप्रमाणेच राजकारण्यांसोबत गुत्तेदारी करण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच मनाला पटला नाही व त्यांनी शेतीत लक्ष घातले. वडिलोपार्जित शेतीत नवीन नवीन प्रयोग करत त्यांनी बाजारात मागणी असलेल्या फळ पिकांना प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याने ते या भागातील प्रगतशील शेतकरी ठरले आहेत. सात वर्षांपूर्वी मुलाला भेटण्यासाठी शिंदे हे हरियाणाला गेले होते. दिल्लीत फळ प्रदर्शनामध्ये त्यांनी खरबुजाच्या आकाराचे एक नवीन फळ पाहिले. त्याला असणारी मागणी लक्षात घेऊन अधिक चौकशी केली तेव्हा इंग्रजीमध्ये पोमेलो म्हणून ओळखले जाणारे हे फळ वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी असल्याची माहिती मिळाली. संकेतस्थळावरूनही या फळाबाबत अधिक माहिती मिळवल्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी दहा रोपे आणून शेतात लावली.

चार वर्षांनंतर या रोपांची झाडे झाली असून त्यांना पहिल्या बहरामध्ये शंभर फळे लागली आहेत. वर्षभरातील दोन बहरात जवळपास एक हजार फळे मिळणार आहेत. पाच वर्षांनंतर झाडाचा आकार वाढत जातो. तशी फळांची संख्याही वाढत जाते. आणि एका झाडाला जवळपास तीनशे फळे लागतात व एका फळाचे वजन एक किलोपर्यंत जाते. चांगल्या प्रतीची जमीन आणि कमी पाण्यात ही फळशेती विकसित होते. पुणे शहरातील बाजारात पोमेलोला बाराशे रुपये डझन भाव असून मोठी मागणी आहे. औषधी म्हणून या फळाचा मोठा फायदा होतो असे सांगितले जाते.

दरवर्षी जानेवारी आणि जून या दोन महिन्यांत चार वर्षे पोसलेल्या झाडांना फळे लागतात. खरबुजाप्रमाणे दिसणारे या फळाची चवही सर्वसाधारण असते. त्यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊन सखाराम शिंदे यांनी यंदा दोन एकरांमध्ये ही पोमेलोची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. पोमेलोची झाडे व फळे बघण्यासाठी कृषी संशोधक, शेतकरी मोठय़ा संख्येने भेटी देत आहेत. सुरुवातीपासूनच शिंदे यांनी वेगवेगळे प्रयोग करून डोंगराळ भागातील शेतीतुनही आर्थिक सुबत्ता मिळवली.

दीड एकरात मोसंबीच्या फळातूनही आठ लाखाचे उत्पन्न

शिंदे यांनी िलबू वर्गातील मोसंबीची दीड एकरात लागवड करून या वर्षी आठ लाखांचे उत्पन्न मिळवले. एका झाडाला सातशे ते आठशे मोसंबी लगडल्या आहेत. गतवर्षी पाच लाख रुपये नफा मोसंबीने कमावून दिला होता. यंदा आठ लाख रुपये मिळतील असा त्यांचा दावा आहे. सुरुवातीला या दीड एकरात ठिबक आणि इतर सुधारणेसाठी त्यांना ५० हजारांपर्यंत खर्च आला. फुले मोसंबी या वाणाच्या मोसंबीला बाजारात २५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. मोसंबीच्या उत्पन्नावरच न थांबता सखाराम यांनी मोसंबीच्या काही झाडांची योग्य रीतीने वाढ घडवून त्यांना फळ न लागू देता नवीन रोप तयार करण्याची प्रणाली अवलंबिली आहे. मोसंबीच्या झाडांच्या छोटय़ा फांद्यांपासून नवीन रोपवाटिका आकाराला आली आहे. त्यांच्या नर्सरीत एक लाख मोसंबीची रोपे तयार आहेत.

केवळ आपणच फळशेती करायची, हा कोता विचार बाजूला सारून त्यांनी इतरांना रोप उपलब्ध करून दिली आहेत. तीन ते चार वष्रे जोपासल्यानंतर मोसंबी वर्षांकाठी आठ लाख आणि त्यापेक्षाही जास्त रुपयांचा नफा देऊ शकते, हे शिंदेनी दाखवून दिले आहे. मोसंबीबरोबरच त्यांनी सुळे िलबाचे एक हजार रोपे तयार केलेली आहे. सुळे िलबूही औषधी आहे. िलबू वर्गातील फळे औषधी आणि आर्थिक क्रांती घडविणारी असल्याने इतरांनीही याकडे वळावे, असे ते सांगतात. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनातून त्यांच्या नर्सरीचे संगोपन केले जातेय. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आर्थिक सुबत्ता मिळवण्याचे आवाहन सखाराम िशदे यांनी केले आहे.

सखाराम िशदेंना शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांमुळे डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार, स्मार्ट आत्मा समाजभूषण पुरस्कार याबरोबरच अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यांची नर्सरी शेतीसाठी मोठे योगदान देणारी ठरत आहे.

  • पोमेलो फळांचे सेवन हे आयुर्वेदिक उपचारात मोडले जाते. या फळाचा रस अनेक रोगापासून मुक्ती देतो. त्यामुळे या फळाची शेती फायदेशीर आहे.
  • एका एकरामध्ये वीस बाय पंधराच्या अंतराने रोपांची लागवड केल्यानंतर जवळपास दीडशे झाडे बसतात.
  • चार वर्षांच्या संगोपनानंतर सुरुवातीच्या वर्षी एका झाडाला शंभर फळे मिळतात. त्यातून वीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणारी ही फळशेती शेतकऱ्यांसाठी आर्थिक वरदान ठरणारी आहे.
  • भारतात बदलत्या जीवनशैलीने आणि रासायनिक अन्नामुळे मधुमेह, हृदयरोग व कर्करोगाचे मोठय़ा प्रमाणात रुग्ण असल्याने या फळाला मागणी कायम राहणार आहे.
  • िशदे यांच्या या औषधी फळशेतीमुळे अनेक शेतकरी प्रभावित झाले असून त्यांनी या शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

vasantmunde@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:37 am

Web Title: medicinal pomelo
Next Stories
1 मत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी करावी?
2 हरभरा उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान
3 पडीक जमिनीचे सेंद्रिय शेतीमुळे ‘सोने’
Just Now!
X