20 November 2017

News Flash

कडुनिंब : एक गोड मित्र

‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला

नीलकंठ बापट | Updated: May 20, 2017 12:27 AM

कडुनिंब झाडाचे असंख्य उपयोग आहेत. ती एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. हजारो वर्षांपासून भारतात त्याचा उपयोग केला जातो. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला आहे.

कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, त्यापासून काढलेले तेल व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. त्यामुळेच त्याला एक वृक्ष औषधालय असे म्हणतात. कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. व त्यामुळेच त्वचा व केस यांच्या अनेक व्याधी दूर करण्यासाठी िलबोणी पर्णरसाचा उपयोग केला जातो. त्वचेचा कोरडेपणा व खाज दूर करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कडुनिंब पेस्टचा उपयोग हेअर कंडिशनर म्हणून उपयोग केला जातो.

चेहऱ्यावरील तारुण्यपीटिकांवर िलबोणी तेलाचा उपाय परिणामकारक ठरतो. कडुनिंबाचे तेल हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फन्गल, अँटी मायक्रोबियल असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा रोगांवर हे तेल रामबाण आहे. विशेषत तेल लावल्यावर ती व्याधी परत उद्भवत नाही. कडुनिंब तेलात फॅटी अ‍ॅसिड व ई जिवनसत्त्व आहे व ते त्वचेत सहज व जलदगतीने शोषून घेतले जाते. त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बऱ्या होतात.

उपयोग

कीटकनाशक, बाग सुशोभित करण्यासाठी, पशुखाद्य, मानवासाठी औषधे, गर्भनिरोधक, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, साबण निर्मिती, ऊर्जा निर्मितीसाठी लाकूड, औषधी तेल असे त्याचे विविध उपयोग आहेत.

कडुनिंब वृक्षाची वैशिष्टय़े

कडुनिंब वृक्ष वर्षभर हरित असतो. अति उन्हाळ्यात काही झाडांची पानगळती होते. हा वृक्ष साधारणपणे २० ते ३० फूट उंच असतो. काही ठिकाणी तो सत्तर फूट उंच झालेला दिसतो. कडुनिंब दीर्घायुषी आहे. तो पन्नास-साठ वष्रे जगतो. त्याची पाने सदा हिरवी असतात. कोवळी पाने तांबूस रंगाची असतात. करवतीच्या दात्यासारखे पानांना दाते असतात.

हा वृक्ष अति थंड, अति पावसाचा, अति दलदलीचा, पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसलेला प्रदेश सोडल्यास इतर सर्वत्र आढळून येतो. अपुरा पाऊस पडला असताही हा वृक्ष तग धरू शकतो. अवर्षण भागाला िलबोणी वृक्ष वरदान आहे. १८ ते ४० इंच पाऊस पडणाऱ्या प्रदेशात कडुिनबाची लागवड होऊ शकते. सहा महिने पाण्याचा तुटवडा असला तरी हा वृक्ष जगू शकतो. त्याची मुळे जमिनीखालील ४० फुटांवरील पाणी शोषून घेऊ शकतात. त्याचा फुलोरा सेंटीमीटर लांब असतो. फूल पिवळ्या रंगाचे असते. त्याला ५ पाकळ्या असतात. त्याचे खोड खडबडीत असते. त्यापासून िडक मिळतो. अशा या सर्वगुणसंपन्न वृक्षाचा देशभर प्रचार व लागवड होणे शेतकऱ्याच्या हिताचे आहे.

शेतीसाठी उपयोग

कडुनिंब  तेल व कडुिलब पर्णरस यांचा उपयोग शेतीतही मोठय़ा प्रमाणावर केला जातो, कारण ते जंतुनाशक, कीटकनाशक व बुरशीनाशक आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतावरच पिकावरील रोगप्रतिबंधक व रोगनाशक औषधे निर्माण करता येतात. बाजारातून औषधे विकत आणण्याची गरज नाही. शिवाय कडुनिंबाची पेंड हे नायट्रोजनयुक्त उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. रासायनिक युरिया खतापेक्षा ते अधिक गुणकारी आहे.

ngbapat@gmail.com

First Published on May 20, 2017 12:27 am

Web Title: neem farming neem benefits