भौगोलिक विविधतेनुसार बोलीभाषेतही विविधता आढळते. त्यामुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बोलीभाषेत पोहोचविणे मोठे अवघड काम आहे. त्यात कृषी शिक्षण हे इंग्रजीमध्ये दिले जाते. इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरताना अनेकांना अडचणी येतात. आजही माध्यमांच्या प्रभावामुळे प्रमाणभाषेचा विस्तार होत असला तरी शेतीत मात्र बोलीभाषा टिकून आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे तर अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात आहेत. समाजात जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते आणि त्याचा भाषा, संस्कृतीशी संबंध येतो तेव्हा परिभाषेतील शब्द जसेच्या तसे वापरले जातात. किंवा त्यामध्ये बदल व मोडतोड करून निराळा शब्द तयार होतो. परिभाषेत या शब्दाला मराठीत प्रतिशब्द तयार करून त्याचा वापर तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर केला तर तो मराठी शब्द रुळतो. तसा प्रयत्न झाला नाही तर मराठीत इंग्रजी शब्दांचा वापर जसाच्या तसा होतो.

ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!
IIIT Nagpur job hiring news marathi
IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती

शेती गेल्या अर्धशतकात बदलली, पीक पद्धत बदलून उत्पादनवाढीचे नवे तंत्रज्ञान आले. त्याचप्रमाणे तंत्रे बदलली अन् तंत्रज्ञानही. या नव्या तंत्रज्ञानाचा परिणाम स्वाभाविकपणे भाषेवर झाला. परदेशातून येणारे तंत्रज्ञान जरी शेतकऱ्यांनी स्वीकारले तरी मराठीत त्याला पारिभाषिक प्रतिशब्द तेवढे परिचित झाले नाही. ते काम आता सुरू झाले आहे. नवे तंत्रज्ञान, आपल्या भाषेत शेतकरी, कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक यांच्यासाठी मोलाचे ठरणार आहे.

बोलीभाषा ही २५ मलांवर बदलते. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी, ठाकरी अशा मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. भौगोलिक विविधतेनुसार बोलीभाषेतही विविधता आढळते. त्यामुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बोलीभाषेत पोहोचविणे मोठे अवघड काम आहे. त्यात कृषी शिक्षण हे इंग्रजीमध्ये दिले जाते. इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरताना अनेकांना अडचणी येतात. आजही माध्यमांच्या प्रभावामुळे प्रमाणभाषेचा विस्तार होत असला तरी शेतीत मात्र बोलीभाषा टिकून आहे. तांदळाला काही ठिकाणी धान, साळ, भात असे म्हणतात, तर पिकातील तण काढण्याच्या कामाला खुरपणी, कोळपणी, िनदणी असे शब्द वेगवेगळ्या विभागांत वापरले जातात. नव्या तंत्रज्ञानामुळे तर अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात आहेत. समाजात जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते आणि त्याचा भाषा, संस्कृतीशी संबंध येतो तेव्हा परिभाषेतील शब्द जसेच्या तसे वापरले जातात किंवा त्यामध्ये बदल व मोडतोड करून निराळा शब्द तयार होतो.

 

परिभाषेत या शब्दाला मराठीत प्रतिशब्द तयार करून त्याचा वापर तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर केला तर तो मराठी शब्द रुळतो. तसा प्रयत्न झाला नाही तर मराठीत इंग्रजी शब्दांचा वापर जसाच्या तसा होतो. त्यामुळे भाषातज्ज्ञ, अभ्यासक हे वेळोवेळी विज्ञानातील संज्ञा, संकल्पना यांना मराठीत प्रतिशब्द देत असतात. म्हणूनच संगणक, माहिती तंत्रज्ञान हे शब्द रूढ होऊन कॉम्प्युटर, आय.टी. या शब्दांना प्रतिशब्द मिळाल्याने मराठी भाषेत ते अधिक वापरले जाऊ लागले. कृषी क्षेत्रात मात्र हे काम मागे पडलेले होते. त्यामुळे इंग्रजी शब्द कृषी क्षेत्रात जसेच्या तसे वापरले जात. त्याला प्रतिशब्द नव्हते. अशा भाषा संचालनालयाने त्याचा विचार करून नव्याने कृषी परिभाषा कोषनिर्मितीचे काम सुरू केले आहे.

१९८३ मध्ये भाषा संचालनालयाने एक समिती स्थापन करून कृषी परिभाषा कोश तयार केला होता. त्यामध्ये इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व त्याला असलेले पर्यायी शब्द व प्रचलित शब्द यांचा त्यात समावेश होता. या परिभाषा कोशाचा वापर गेली अनेक वर्षे कृषी शास्त्रज्ञ, विद्यार्थी, अभ्यासक, लेखक हे करीत आहेत. या परिभाषा कोशात दुरुस्ती झाली नव्हती. त्यानंतर जगभरात विविध भाषा सुमारे दोनशेच्या आसपास डिक्शनरीत (शब्दकोश) आले. त्यामध्ये हजारो प्रतिशब्द आहेत. मात्र मराठीत तसे प्रयत्न अपवादाने झाले. आता मात्र सरकारने त्याकरिता पुढाकार घेतला आहे.

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीनंतर त्याला गती आली. मागील वर्षी मे महिन्यात सरकारने कृषी शास्त्र परिभाषा कोश स्थापन करून त्याकरिता राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव उम्लेक यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात भाषा सल्लागार समितीचे अनिल गोरे, मराठी विज्ञान परिषदेचे विठ्ठल चापके तसेच पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे केतनकुमार चौधरी तसेच आर.डब्ल्यू. गावडे, गजेंद्र जगताप, दीपक हाíडकर हे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व भाषा संचालक कुलकर्णी यांचा त्यात समावेश आहे. या समितीच्या बठका होऊन इंग्रजी शब्दांना पर्यायी असे ९ हजार शब्द कृषी भाषाकोशात समाविष्ट करण्यात आले आहेत. आणखी शब्द समाविष्ट करण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. २५ ते ३० हजार पर्यायी शब्द, रूढ शब्द, प्रचलित शब्द व नवीन शब्द नव्या परिभाषा कोशात यावेत अस प्रयत्न आहे. त्याकरिता राज्यात १४० कृषी महाविद्यालये असून सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांची मदत घेतली जात असून विद्यार्थ्यांचा व संशोधक, प्राध्यापक यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. उल्मेक यांचे म्हणणे आहे.

कृषी परिभाषा कोशात यापूर्वी केवळ ८ हजार शब्द होते. आता त्यात ३० हजार शब्दांची भर पडणार असल्याने लेखक, अभ्यासक, कृषी शास्त्रज्ञ यांना सोप्या भाषेत लेख लिहिण्यासाठी मदत होऊ शकेल. बोलीभाषेत शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेता येणार आहे. असा प्रयत्न कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने भाषा संचालनालय अनेक वर्षांनंतर करत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक बदल आत्मसात करण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.

जुन्या नोंदी अद्ययावत होणार..

मराठी भाषा विश्वकोश निर्मितीचे काम १९७३ पासून सुरू झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या काळात २० खंड प्रकाशित झाले. ते २० खंड संगणकावर उपलब्ध आहेत. तसेच सर्व खंडांच्या नोंदींचा विस्तार करण्याचे काम सुरू आहे. पूर्वी विश्वकोशाच्या विज्ञान या विभागात कृषी क्षेत्राच्या नोंदी असत; पण आता कृषी मराठी भाषा विश्वकोश निर्मिती मंडळाने कृषी या विषयाचा स्वतंत्र उपविभागात समावेश केलेला असून त्यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना केली आहे. या ज्ञानमंडळासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्याकरिता कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. विश्वकोशाचे खंड तयार झाले त्या वेळी शेतीत जनुकबदल पिके, सूक्ष्म सिंचन पद्धत, नॅनो तंत्रज्ञान, बंदिस्त पीक पद्धती अशा अनेक गोष्टी नव्हत्या. नव्या संशोधन व तंत्राने शेतीत बदल झाले त्याची नोंद आता घेतली जाणार असून जुन्या नोंदी अद्ययावत करून नवीन माहिती विश्वकोशात समाविष्ट केली जाणार आहे. डॉ. उल्मेक हे त्यासाठी तज्ज्ञ म्हणून नेमण्यात आलेले आहे. विश्वकोशात नोंदी अद्ययावत करण्यासाठी मदत करणाऱ्या शास्त्रज्ञ व लेखकांना मानधन दिले जाणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमांमुळे शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध होणार आहे. मराठी भाषेचे वैभव वाढविणाऱ्या या उपक्रमात सर्वानीच सहभागी होण्याची गरज आहे.

ashok_tupe@expressindia.com