कोरडवाहू शेतीचे नेमके कसे नियोजन केले पाहिजे याबाबतीत इंग्रजाच्या काळातच संशोधन केंद्र सुरू झाले. सोलापूर येथे १६५ एकर जागेत सुमारे १७ शास्त्रज्ञ व १७५ कर्मचारी आज काम करत आहेत. या केंद्रातून अनेक संशोधने आजपर्यंत झाली व त्याचा लाभ कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात झाला. १९३२ साली ब्रिटिशांनी मुंबई कोरडवाहू शेती पद्धत या नावाने मुंबईत संशोधन केंद्र सुरू केले. मात्र त्यानंतर मुंबई परिसरात कोरडवाहू फारशी जमीन नाही हे त्यांच्या लक्षात आले व १९३३ साली सोलापूर शहराची या संशोधन केंद्रासाठी निवड करण्यात आली.

आजही देशातील ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक शेती कोरडवाहू. महाराष्ट्रात तर हे प्रमाण ८३ टक्क्य़ांपेक्षाही अधिक आहे. बेभरवशाच्या निसर्गावर अशी शेती करावी लागते. तेव्हा अशा शेतीचे नेमके कसे नियोजन केले पाहिजे याबाबतीत इंग्रजाच्या काळातच संशोधन केंद्र सुरू झाले. सोलापूर येथे १६५ एकर जागेत सुमारे १७ शास्त्रज्ञ व १७५ कर्मचारी आज काम करत आहेत. या केंद्रातून अनेक संशोधन आजपर्यंत झाले व त्याचा लाभ कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात झाला.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
ग्रामविकासाची कहाणी
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

१९३२ साली ब्रिटिशांनी मुंबई कोरडवाहू शेती पद्धत या नावाने मुंबईत संशोधन केंद्र सुरू केले. मात्र त्यानंतर मुंबई परिसरात कोरडवाहू फारशी जमीन नाही हे त्यांच्या लक्षात आले व १९३३ साली सोलापूर शहराची या संशोधन केंद्रासाठी निवड करण्यात आली. त्या काळात देशातील हे एकमेव संशोधन केंद्र होते. १९३३ ते १९४४ या पहिल्या टप्प्यात या संशोधन केंद्रामार्फत पारंपरिक शेतीत काय बदल केले पाहिजेत, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी नेमके काय प्रयोग केले पाहिजेत याचे संशोधन करण्यात आले. रब्बी पिकावर त्याचे प्रयोग झाले. या प्रयोगातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात ५० टक्के वाढ झाल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत.

१९४५ ते ६४ या कालावधीत या संशोधन केंद्राने दुसरा टप्पा गाठला. माती परीक्षण करण्यासाठीची पहिली प्रयोगशाळा येथे कार्यरत झाली. सोलापूर व आसपासच्या भागात जमिनीच्या उतारामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. मातीतील नत्र, स्फूरद, पालाश याच्या प्रमाणाचा अभ्यास करून त्याची माहिती लोकांना देणे सुरू झाले. देशात एकमेव असे केंद्र असून ते पुरेसे ठरणार नाही हे लक्षात घेऊन १९७० मध्ये भारतातील विविध राज्यात २३ केंद्रांची स्थापना झाली. त्यात महाराष्ट्रातील अकोला, परभणी, कर्नाटकातील विजापूर, तामिळनाडूमधील केविलपट्टी अशा केंद्रांचा समावेश आहे.

१९७० नंतर देशभर कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने चांगली गती घेतली. रोगाला प्रतिकार करू शकण्यासाठीचे उपाय, नवीन वाण, कमी पाण्यावर उगवणारे वाण, उन्हाचा तडाखा सहन करू शकतील असे वाण याची निर्मिती झाली. याच कालावधीत कृषी औजाराची निर्मिती करण्यात आली. त्यापूर्वी पारंपरिक लाकडी औजारे होती. १९८४ नंतर कृषी हवामान अभ्यास, कृषी अर्थशास्त्र, कोरडवाहू फळबागा, मातीतील सुक्ष्मजीव घटक, पीक संरक्षक, किडनियंत्रण यावरील अभ्यासावर भर देण्यात आला. रब्बी हंगामात करडई, सूर्यफुलाचा पेरा १९७० पासून वाढण्यास सुरुवात झाला. त्या सुमारास शेतकऱ्यांच्या शेतावर खते, बी-बियाणे, नवीन जाती, नवीन तंत्रज्ञान याचे प्रयोग सुरू झाले. सध्या देशात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे बीज १९८५ साली सोलापुरात रोवले गेले हाते. त्या वेळी राष्ट्रीय कृषी संशोधन या नावाने ती सुरू झाली. १९८९ साली कोरडवाहूशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू करण्यात आली. गावे दत्तक घेऊन कार्यान्वित संशोधन प्रकल्प असा उपक्रम राबवला गेला. सोलापूर जिल्हय़ातील मंद्रुप गावात एकात्मिक कोरडवाहू कृषी विकास प्रकल्प राबवला गेला. त्यात त्या गावातील ५० टक्के शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बार्शी तालुक्यातील सासुर, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी, अक्कलकोट तालुक्यातील हांदगा आदी गावांत हे उपक्रम राबवले गेले. त्यानंतर सोलापूर जिल्हय़ालगतच्या सांगली, सातारा, नगर, पुणे गावातही हे उपक्रम राबवले गेले. शाश्वत पीक उत्पादन कोरडवाहू शेतीत योग्य तंत्रज्ञान विकसित करणे, पाणलोट क्षेत्रातील मृद व जलसंधारण पाण्याचा पुनर्वापर कसा करावा याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. आज सगळीकडे शेततळे शेतकऱ्यांच्या शेतात केली जात आहेत.

काही ठिकाणी या तळय़ात आच्छादन टाकून साठवलेले पाणी गरजेनुसार पिकाला दिले जाते. मात्र ही कल्पना १९४० साली सोलापूर केंद्राने सुचवलेली होती. मोठे तलाव, छोटे तलाव यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतात  नसíगक रीत्या जेथे उतार आहे तेथे शेततळे घेऊन त्या पाण्याचा पुनर्वापर करावा अशी संकल्पना त्यांनी मांडली होती.

कोरडवाहू शेतीत मुख्य अडचण ही पावसाचा पिकाला पडणारा ताण ही आहे. पीक फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिली तर नेमके करायचे काय? पूर्वी नक्षत्राप्रमाणे पाऊस पडत होता. आता सर्वच अनिश्चितता आहे. यावर उपाय म्हणून शेतातील पाणी वाहून जाऊ नये  यासाठी उथळ, मध्यम, समपातळीवर आडवे बांध घालण्याची संकल्पना या केंद्राने रुजविली. सपाट वाफे तयार करावेत. तीन वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी. दरवर्षी नांगरट करण्याची गरज नाही ही बाबही शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पोहोचवली. पाणी साठवण्याच्या पद्धतीत सरी वरंबा, फळ पिकांसाठी अर्धवर्तुळ, चंद्रवलयांकित बांध, समतल पद्धती या बाबीही शेतकऱ्यांना सांगितल्या. रब्बी पिकांसाठी सेंद्रिय खताचे आच्छादन करण्याची संकल्पना मांडली. त्यातून जमिनीची पाणी धारण क्षमता वाढेल व बाष्पीभवन कमी होईल, असे सुचविले. पाऊस कसा पडतो त्यानुसार पिकांचे नियोजन करावे याचे मार्गदर्शनही केंद्राद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आले. जूनमध्ये मृग नक्षत्रावर पाऊस पडला तर कोणती पिके घ्यावीत, पंधरा दिवसाने उशिरा पाऊस आला तर काय करावे, याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.

अत्यल्प पाण्यावर येणारी बाजरी, करडई व ज्वारीच्या अनेक नव्या जाती विकसित करण्यात आल्या. भीमा, फुले, कुसुम, एसएसएफ ६५८, ७०८, ७३३ या जातीतून कोरडवाहू शेतीत हेक्टरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले व जिरायतीत उत्पन्नाचे प्रमाण २५ क्विंटलपर्यंत राहिले. रब्बी हंगामातील ज्वारीसाठी जमिनीच्या प्रतवारीनुसार अनेक जाती विकसित केल्या. हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माउली, सिलेक्शन ही १०० ते ११० दिवसांत काढणीला येणारी जात हेक्टरी १० क्विंटल उत्पादन देते. मध्यम स्वरूपाच्या जमिनीत फुले चित्रा, फुले माउली व पारंपरिक मालदांडी जी १२० दिवसांत येते  व १७ क्विंटल हेक्टरी उत्पादन देते. खोल काळय़ा जमिनीत फुले मथुरा, वसुधा, रेवती, सुचित्रा, सीएचव्ही २२ या जाती विकसित केल्या. १२० दिवसाला काढणीला येणाऱ्या या जातीचे उत्पन्न ३० क्विंटलपर्यंत होते. बागायती जमिनीत या उत्पन्नात दीडपटीने वाढ होते. जे पिकते ते विकल्यापेक्षा जे विकते ते पिकवले पाहिजे हे शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला. हवामानाच्या अनिश्चिततेवर उत्तर काढण्यासाठीचे नवीन वाण विकसित केले जात आहे. तूर व ज्वारी ही कोरडवाहू शेतीतील महत्त्वाची पिके आहेत. याचा काढणीचा कालावधी कमी होणारी व वाणाची गुणवत्ता कायम ठेवणारी जात विकसित करण्यासाठीचे संशोधन सध्या सुरू असल्याचे सोलापूर केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजयकुमार अमृतसागर यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. शासन स्तरावर संशोधन होतेही. मात्र, हे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे तरच शेतीची उत्पादकता वाढेल अन् नव्या पिढीला शेती करण्यात रस निर्माण होईल.

पिकांची निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

कोरडवाहू शेतीसाठी देखील काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस, त्या ठिकाणची जमिनीतील पाण्याची पातळी याचा अभ्यास करून वेगवेगळय़ा वाणाचे प्रयोग करण्याची गरज आहे. नांदेड व परभणी या भागात तुलनेने बरा पाऊस आहे. एकदा पेरलेली तूर सलग दोन वष्रे घेता येईल का, असा प्रयोग करणे आवश्यक आहे. कोकणात मोठय़ा प्रमाणावर पाऊस होते. तेथे बांधावर तूर लावणीचे प्रयोग यशस्वी झाले. अति पाऊस असणाऱ्या कोल्हापूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी एकदा लावलेल्या उसाचे पाच वेळा उत्पादन घेतले आहे. आगामी काळात बदलत्या हवामानाला तोंड देणाऱ्या जाती विकसित करून त्याची निगा कशी राखली पाहिजे, याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्याचे प्रयोग या केंद्रामार्फत केले जाणार असल्याचे अमृतसागर यांनी सांगितले.
प्रदीप नणंदकर – pradeepnanandkar@gmail.com