रायगड जिल्ह्यत २०१७ – २०१८च्या खरीप  हंगामात १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर  विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. १  लाख २३ हजार  ७०० हेक्टरवर भाताची लागवड करून भाताची उत्पादकता प्रती हेक्टरी ३ हजार किलो करण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात  चालू वर्षी  खरीप हंगामात १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्र विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यात १ लाख २३  हजार ७०० हेक्टरवर भात पीक घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागली १० हजार ५०० हेक्टरवर, तृणधान्य ४ हजार ६०० हेक्टरवर , तूर १ हजार  ३५० हेक्टर तर इतर कडधान्य १ हजार ४० हेक्टरवर घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

यंदा भाताची उत्पादकता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी प्रती हेक्टरी २७६१ किलो भाताची उत्पादकता होती. ती यंदा वाढवून प्रती हेक्टरी ३००० किलो करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागलीची उत्पादकता गेल्या वर्षी प्रती हेक्टरी ८४२ किलो होती ती यंदा १००० किलो करण्यात आली आहे.

यंदा ११ हजार ८१५ िक्वटल बियाणांची मागणी करण्यात येणार आहे. महाबीजचे ८ हजार ५४५ िक्वटल खासगी ३ हजार २०० िक्वटल असे ११ हजार ७४५ क्िंवटल सुधारित व महाबीजचे संकरीत ६० िक्वटल. खासगी संकरीत १० िक्वटल बियाणांची मागणी करण्यात येणार आहे. बांधावर खत योजनेसाठी ४ हजार ६०० मेट्रिक टन युरोया व १ हजार ६२० मॅट्रिक टन मिश्र असे एकूण ६ हजार २२० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यत खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर २ व प्रत्येक तालुक्यामध्ये १ अशी १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठाचा पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नमुने उत्पादन स्थळावर तसेच साठवणूक केंद्रांवर घेण्यात याव्यात. अप्रमाणित नमुना, कृषी निविष्ठा आल्यास त्या जप्त कराव्यात. अशा सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती रायगडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी दिली.

meharshad07@gmail.com