* कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, बियाणे यांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी चीनमधील शांघाय महानगरपालिका कृषी आयोगाने पंजाब सरकारशी भागीदारी केली आहे.
* शांघाय महानगरपालिका कृषी आयोगाचे उपाध्यक्ष फेंग झियोंग यांनी या उपक्रमाची माहिती दिली. आयोगाच्या सदस्यांनी पंजाबला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
* पंजाब सरकारने कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद असून पंजाबमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी असल्याचे झियोंग यांनी सांगितले.
* पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल म्हणाले की, चीनची गुंतवणूक पंजाबमधील दुग्धव्यवसायाला उभारी देणारी ठरू शकेल. पंजाबमध्ये दुग्ध पुरवठा करण्यात अडचणी येतात. मात्र, त्यावर या करारामुळे मात करणे शक्य होणार आहे.

कृषी उत्पन्नावर कर नाही – केंद्रीय अर्थमंत्री
* संसदेत काही विरोधकांनी कृषी उत्पन्नावर कर लादण्याची केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
* लोकसभेत २०१६-१७ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
* यंदाच्या वर्षी चांगला मान्सून झाल्यास शेती उत्पादनात वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्था अधिक स्थिर होण्यास हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
* मान्सूनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि येथील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, असेही यावेळी जेटली यांनी स्पष्ट
केले.