18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

शून्य खर्चाच्या शेतीचे गणित

सन १९४७ साली िहदुस्थानची फाळणी झाली व भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून जन्माला

डॉ. नीलकंठ बापट | Updated: June 17, 2017 1:48 AM

महाराष्ट्रातील पाऊसमानही बेभरवशाचे आहे. दर तीन वर्षांनी अवर्षण व दहा वर्षांनी दुष्काळ अनुभवास येतो. या परिस्थितीत अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर होते. कर्ज न फिटल्यामुळे जमिनी जप्त होतात. हे सर्व प्रश्न त्याला देशोधडीला लावतात. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विदर्भातील एक संशोधक वृत्तीचे व्यवहारी शेतकरी सुभाष पालेकर यांनी शून्य खर्चाची तथा झिरो बजेट फाìमग ही संकल्पना मांडली आहे.

सन १९४७ साली िहदुस्थानची फाळणी झाली व भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून जन्माला आला. परंतु स्वातंत्र्याबरोबर दोन गहन प्रश्न निर्माण झाले. एक,लोकसंख्येची अदलाबदल व दोन अन्नधान्याचा तुडवडा. गहू पिकवणारा पंजाब व तांदूळ पिकवणारा बंगाल हे पाकिस्तानात गेले. भारताला बराच काळ परदेशातून विशेषत अमेरिकेतून अन्नधान्य आयात करावे लागले. १९६०च्या सुमारास कृषी क्षेत्रात एक क्रांतिकारक शोध लागला.

मेक्सिको येथील कृषी शास्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉ यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या अन्नधान्याच्या नव्या जाती शोधून काढल्या विशेषत गहू व तांदुळाच्या. त्याचप्रमाणे अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारी व बाजरीचे मिश्र (ऌ८ु१्र)ि वाणही शास्रज्ञांनी विकसित केले. नव्या वाणांना जास्त प्रमाणात पाणी व खते यांची गरज लागते. ही गरज नवी धरणे, विहिरी, तलाव, रासायनिक खते, शासनाची नवी शेतकऱ्यांना लाभदायक धोरणे यामुळे शेतमालाच्या विशेषत अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली व एकेकाळचा अन्नधान्य आयात करणारा भारत अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून जगप्रसिद्ध झाला. हीच स्थिती हरित क्रांती म्हणून ओळखली जाते.

हरित क्रांतीचा हा सतत उत्पादन वाढीचा काळ एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला संपत आल्याचा अनुभव कृषी तज्ञ व अर्थतज्ज्ञांना जाणवू लागला. सतत रासायनिक खतांचा, औषधे व पाण्याचा अमर्यादित उपयोग यामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या. अनेक जमिनी तर पूर्णपणे लागवडीस अयोग्य झाल्या.  जमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली. शेतकऱ्याचे जीवन अधिकाधिक प्रमाणात बाजारावर अवलंबून राहू लागले. पूर्वी खते, जंतुनाशके व बी-बियाणे शेतकऱ्याला घरातच वा आसपासच्या परिसरात उपलब्ध होत होती. त्यासाठी रोकड पशांची गरज नव्हती. परंतु हरित क्रांतीची अर्थव्यवस्था भिन्न होती. शेतीस लागणारी प्रत्येक वस्तू पसे देऊन बाजारातून विकतच आणावी लागली व त्यासाठी भांडवलाची जरूरी भासू लागली. बँक वा सावकाराकडून कर्ज घेणे अपरिहार्य झाले. कर्ज फेडीसाठी कृषी उत्पादने बाजारात विकणे अपरिहार्य झाले. पण बाजारात व्यापाऱ्यांनी केलेल्या कोंडीमुळे शेतकऱ्याला योग्य भाव मिळणे कठीण झाले. कर्जाचे हप्ते न भरल्याने शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागतात व या लाजिरवाण्या परिस्थितीमुळे अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. थोडक्यात हरित क्रांती व बाजारमुखी कृषी अर्थव्यवस्था यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या व समाजात असंतोष वाढला. महाराष्ट्रातील पाऊसमानही बेभरवशाचे आहे. दर तीन वर्षांनी अवर्षण व दहा वर्षांनी दुष्काळ अनुभवास येतो. या परिस्थितीत अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर होते. कर्ज न फिटल्यामुळे जमिनी जप्त होतात. हे सर्व प्रश्न त्याला देशोधडीला लावतात. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विदर्भातील एक संशोधक वृत्तीचे व्यवहारी शेतकरी सुभाष पालेकर यांनी शून्य खर्चाची तथा झिरो बजेट फाìमग ही संकल्पना मांडली आहे. कर्नाटक व तेलंगणा या राज्यांनी या प्रणालीस अधिकृत मान्यता दिली आहे व केंद्र सरकारने पालेकरांना पद्मश्री देऊन सन्मान केला आहे. पालेकरांच्या मते ते काही नवीन सांगत नाहीत तर परंपरेने व अनुभवाने जे सिद्ध झाले आहे पण आज जे प्रचलित नाही पण जे उपयुक्त आहे त्याचाच ते प्रचार करत आहेत. काय आहे शून्य खर्चाची शेती ते आता पाहू.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे दोन ज्वलंत प्रश्न विचारात घेऊन शेती मशागतीची ‘झिरो बजेट फाìमग’ ही योजना तयार केली आहे. तिची चार वैशिष्टय़े आहेत.

१. कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त. अल्पभूधारक शेतकऱ्याला बहुतेक वेळा पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याचा थोडासाही ताण सहन होत नाही. झिरो बजेट फाìमगमध्ये विविध तऱ्हेने झाडाच्या मुळाशी ओलावा राहील याची काळती घेतली जाते.

२. शेतीची मशागत सुरू करताना पसे देऊन बाजारातून कोणतीही वस्तू आणावी लागत नाही.म्हणूनच त्याला ‘झिरो बजेट फाìमग’ असे म्हटले आहे. उदाहरणार्थ बी बियाणे, खते, जंतुनाशके. या सर्व वस्तू शेतातच उपलब्ध होतात. देशी बियाणाला प्राधान्य दिले जाते कारण ते परत परत वापरता येते. हायब्रीड बियाणे दरवर्षी नव्याने बाजारातून खरेदी करावे लागते व त्यासाठी रोकड पशाची गरज लागते आणि ते लहान शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतात. देशी वाण अनेक वष्रे वापरात असल्याने सिद्ध झालेले आहे. त्याची उत्पादकता निश्चित असते.

३. शेतीसाठी कमीत कमी पाणी लागते. त्यामुळे अवर्षणातही पीक तग धरू शकते.

४. ‘झिरो बजेट फाìमग’ देशी गाय व तिच्यापासून मिळणारे शेण व मूत्र यावर आधारित आहे. म्हैस वा अन्य प्राण्याचे शेण वा मूत्र देशी गाईपेक्षा कमी प्रतीचे आहे. गाय कशी निवडावी याविषयी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. विलायती गाईपेक्षा देशी गाय, दुभत्या गाईपेक्षा भाकड गाय, बलापेक्षा गाय अधिक उपयुक्त आहे. अनुभव असा आहे की एका गाईच्या आधारे ३० एकर शेतीची मशागत करता येते. शेतकरी स्वावलंबी व स्वयंपूर्ण रहातो.

‘झिरो बजेट फाìमग’ हे पाच द्रव्यांवर अवलंबून आहे. ही द्रव्ये शेतकरी स्वत आपल्या शेतात तयार करतो. त्यासाठी बाजारातून फार अल्प प्रमाणात वस्तू आणाव्या लागतात व या वस्तू सर्वत्र उपलब्ध असतात. त्यासाठी येणारा खर्चही अल्प असतो. या द्रव्यांची नावे अशी. ही नावे वा त्यातील द्रव्ये ही सर्वाना खुली आहेत.

बीजामृत

बी वा रोपे, ती लावण्यापूर्वी बीजामृतात काही काळ बुडवून ठेवावित व मग त्याची लागवड करावी. त्यामुळे बियाणे व रोपे यांना जंतुसंसर्ग होत नाही. पेरणीनंतर उगवण लवकर व जोरदार होते. हे बीजामृत

शेतावरच तयार करता येते. एक एकरासाठी बीजामृत तयार करण्यासाठी खालील वस्तू एकत्र करून

द्रावण तयार केले जाते. त्यात पाणी २० लिटर, देशी गाईचे शेण  ५ किलो, गोमूत्र ५ लिटर, जमिनीवरील मूठभर माती, चुना ५० ग्रॅम या घटकांचा समावेश आहे.

जीवामृत

एक एकरावरील पीकासाठी ६ वेगवेगळ्या वस्तू एकत्र करून द्रावण तयार केले जाते. हे द्रावण एका वेळेसाठी उपयोगी पडते. हे द्रावण झाडापाशी टाकले जाते. दर पंधरा दिवसांनी टाकणे ज्यास्त उपयोगी ठरते. जमले नाही तर किमान महिन्यातून एकदा तरी टाकावेच. द्रावण हे खत नव्हे.झिरो बजेट तत्त्वज्ञानानुसार जमिनीत झाडाला आवश्यक ती अन्नद्रव्ये असतातच. जीवामृतामुळे जमिनीतील असंख्य जीवाणू उत्साही व चळवळी रहातात व त्यामुळे जमीन सछिद्र रहाते व जमिनीतील ती द्रव्ये झाडाला उपलब्ध होतात .

जीवामृतातील ६ घटक पाणी २०० लिटर, देशी गायीचे शेण  १० किलो, देशी गायीचे मूत्र  ५ ते १० लिटर, गूळ २ किलो, डाळीचे पीठ २ किलो, शेतातील मूठभर माती या प्रमाणात एकत्र केले जाते.

मिल्चग

झाडाच्या बुडाशी असलेला ओलावा उडून जाऊ नये, त्याची वाफ होऊ नये या हेतूने झाडाच्या बुडाशी ओल्या झाडपाल्याचे आछादन केले जाते यालाच मल्चिंग म्हणतात. ‘झिरो बजेट फाìमग’चा एक प्रमुख उद्देश हा आहे की कमीत कमी पाण्यात शेती करता आली पाहिजे. या उद्देशपूर्तीसाठी मिल्चग आवश्यक आहे.

जंतुनाशके

१. फंगिसाईड – १, (बुरशीनाशक-१)  – यामध्ये पाच दिवस आंबवलेले ताक ५ लिटर आणि पाणी ५० लिटर यांचे मिश्रण.

२. फंगिसाईड – २. (बुरशीनाशक -२०) – यामध्ये   देशी गायीचे दूध  ५ लिटर, काळी मिरी पावडर  २०० ग्रॅम, पाणी २०० लिटर यांचे मिश्रण.

३. इनसेक्टिसाईड-१, (कीटकनाशक-१) –  िलबोणी वा िलबोणी झाडाच्या पानाची पावडर २० किलो.

४. इनसेक्टिसाईड-२ (कीटकनाशक-२) – यामध्ये  गायीचे शेण ५ किलो, गोमूत्र   १० लिटर,  कडू िलबाची पाने १० किलो, पाणी   २०० लिटर यांचे मिश्रण.

५. इनसेक्टिसाईड- ३ (कीटकनाशक-३) – यात  कडू िलबाची पाने १० किलो, तंबाखू पावडर ३ किलो,   आल्याचा ठेचा ३ किलो, हिरव्या मिरचीचा ठेचा ४ किलो वरील घटक वस्तू गोमूत्रात १० दिवस भिजत ठेवावेत. वरील मिश्रणातील ३ लिटर मिश्रण १०० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

मिश्र पीक योजना व पिकांची चक्रगती

नसíगक शेतीत शेतात एकच एक पीक घेतले जात नाही. तर दोन तीन पिके एकाच वेळी घेतली जातात. पिकाच्या दोन ओळीत अंतर ठेवले जाते व त्या रिकाम्या जागेत हरभरा, तूर, मूग यासारखी जमिनीत नत्र निर्माण करणारी कडधान्ये वा भाजीपाला यासारख्या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. त्यामुळे एक पीक बुडाले तरी दुसऱ्या पिकापासून उत्पन्न मिळते. हा प्रयोग एका अर्थाने पीक विमाच होय.

ngbapat36@gmail.com

First Published on June 17, 2017 1:48 am

Web Title: zero cost farming