हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे विशिष्ट महत्त्व आहे. आपल्या देशात साजरे होणारे सण हे आपल्याला आनंद तर देतातच, पण त्याचबरोबर ते निसर्गाशीही निगडीत असतात. भारतात सध्या दिवाळीची धामधूम पाहायला मिळतेय. अनेक घरातील साफसफाई पूर्ण झाली असून फरळाचा घमघमाट सुटू लागला आहे. दिवाळी येताच लोक खरेदी करायला सुरुवात करतात. यावेळी महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.

दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. यंदा २२ तारखेला धनत्रोयदशी आहे. या दिवशी सोने, चांदी, भांडी, तसेच झाडू खरेदी करण्याची प्रथा आहे. अशी मान्यता आहे की या वस्तू खरेदी केल्यास भगवान कुबेर प्रसन्न होतात. दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक घरात झाडूची खरेदी केली जाते. मात्र असे का केले जाते हे तुम्हाला माहीत आहे का? या दिवशी झाडू का विकत घेतात असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी नक्कीच पडला असेल. आज आपण याचे उत्तर जाणून घेऊया.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
2nd April Tuesday Marathi Panchang Rashi Bhavishya
२ एप्रिल पंचांग: शेअर बाजारात फायदा ते जोडीदाराचं आरोग्य, आजच्या अष्टमीला तुमच्या राशीत काय लिहिलंय?
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्यास घरात सुख-शांती नांदते आणि धनलाभही होतो. घरातील आर्थिक समस्यांचे निराकरणही होते, असे म्हणतात. यासंबंधीची आणखी एक मान्यता अशी आहे की या दिवशी झाडूची खरेदी केल्याने देवी लक्ष्मी आपले घर सोडून कुठेही जात नाही आणि घरामध्ये सकारात्मकता पसरते.

  • असे म्हणतात, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करते.
  • इतकेच नाही, जर तुम्ही नव्या घरात प्रवेश करत असाल, तर नवी झाडू घेऊनच या घरात गृहप्रवेश करावा. असे करणे शुभ मानले जाते.
  • धनत्रयोदशीच्या दिवशी नवी झाडू खरेदी करून त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर सुरू करावा. झाडूचा योग्य उपयोग केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते असे म्हणतात.
  • अशीही मान्यता आहे की झाडूचा अपमान करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान करणे. म्हणूनच कधीही झाडूला पाय लावू नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला अनेकदा सांगितले असेल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)