Dussehra Festival 2022 135 year old temple 6 crore notes decor and 8 crore rupees gold clothes lakshmi mata photos | Loksatta

Dussehra 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास, १३५ वर्ष जुन्या श्रीमंत देवीचे रूप पाहा

Navratri Hatke Celebration: जवळपास दोन दशकांपासून दसऱ्याच्या सोहळ्यात देवीला सोन्याने आणि नोटांची आरास करून सजवण्याची परंपरा या मंदिरात आहे.

Dussehra 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास, १३५ वर्ष जुन्या श्रीमंत देवीचे रूप पाहा
Dusshera 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास (ANI)

Navratri Unique Tradition: आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या दसरा उत्सवाचा एक भाग म्हणून, देवी वासवी कन्यका परमेश्वरीचे १३५ वर्षे जुने मंदिर नवरात्रीसाठी सजवण्यात आले आहे. या मंदिरातील काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमधील देवतेला ६ किलो सोने व ३ किलो चांदीची आभूषणे व वस्त्रे घालण्यात आली आहेत. या दागिन्यांची किमंत तब्बल ८ कोटी रुपये आहेगोदावरी जिल्ह्यातील पश्चिमेकडे पेनुगोंडा या शहरात वासवी कन्यका परमेश्वरीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. केवळ दागिनेच नव्हे तर मंदिराच्या गाभाऱ्यात भिंतीवर नोटा चिकटवून सजावट करण्यात आली आहे.

जवळपास दोन दशकांपासून दसऱ्याच्या सोहळ्यात देवीला सोन्याने आणि नोटांची आरास करून सजवण्याची परंपरा या मंदिरात आहे. देवी महालक्ष्मीचे हे मोहक रूप पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आपण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाहू शकता देवीच्या मूर्तीमागे नोटांची सजावट करण्यात आली आहेत, मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार सजावटीसाठी ६ कोटी रुपयांच्या नोटांचा वापर झाला आहे. याशिवाय देवीच्या गाभाऱ्याबाहेरही नोटांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

६ कोटी रुपये व सोन्या-चांदीची महालक्ष्मी

Navratri 2022: आदिशक्तीच्या जागरात ‘ती’ला प्रवेश नाही; नवरात्रीत ‘या’ मंदिरात महिलांना मनाई का घातली जाते?

दरम्यान, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या या पैशांच्या नोटा उत्सव सम्पल्यावर म्हणजेच नवरात्री नंतर मंदिरात जमा होणार नसून ज्यांनी हे दान केले होते त्यांनाच परत केले जाईल. याबाबत मंदिर समितीने एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना माहिती दिली. पुढे मंदिर समितीचे अधिकारी असेही म्हणतात की ही परंपरा श्रद्धाळू भाविकांनीच सुरु केली आहे. ‘देवी नवरात्री उस्तावलु’ असे या नऊ दिवसांच्या सोहळ्याचे नाव असते यात जो कोणी व्यक्ती देवीला नैवेद्य दाखवेल त्याला व्यवसाय व खाजगी आयुष्यात लाभ होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मराठीतील सर्व लोक उत्सव ( Lokutsav ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

संबंधित बातम्या

Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
माकड करतंय टायपिंग, त्याच्या मेंदूमध्ये बसवलीय चिप… काय आहे एलॉन मस्क यांच्या डोक्यात?
Pre Wedding Photoshoot दरम्यान हत्तीने घातला धिंगाणा; नेमके काय घडले पाहा Viral Video
देशी जुगाड! मुलाने बनवली भन्नाट गाडी, केवळ १० रुपयांमध्ये पार करणार १५० किलोमीटरचं अंतर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम